|Friday, November 15, 2019
You are here: Home » Top News » वाढती असहिष्णूता, झुंडबळी देशाच्या आर्थिक विकासाला मारक : गोदरेज

वाढती असहिष्णूता, झुंडबळी देशाच्या आर्थिक विकासाला मारक : गोदरेज 

ऑनलाईन टीम / मुंबई :

देशातील वाढती असहिष्णुता, महिलांविरोधातील हिंसाचार, झुंडबळी आणि धार्मिक हिंसक घटना या आर्थिक विकासाला मारक ठरू शकतात. सामाजिक एकता टिकवायची असेल तर अशा घटनांना आळा घालण्याची गरज आहे, असे उद्योजक गोदरेज यांनी म्हटले आहे.

गेल्या चार दशकात यंदा बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. बेरोजगारी 6.1 टक्क्मयांवर पोहोचली आहे. हा प्रश्नही लवकरात लवकर सोडवण्याची गरज आहे, देशातील वाढती असहिष्णुता आणि झुंडबळींच्या प्रकारांमुळे आर्थिक विकासाला मोठा फटका बसू शकतो. या घटनांना तातडीने आळा घालण्याची गरज आहे. प्लॅस्टिकच्या बेसुमार वापरामुळे देशात पाणी टंचाई निर्माण झाली आहे, असेही गोदरेज म्हणाले.

Related posts: