|Friday, November 15, 2019
You are here: Home » Top News » इफ्फीचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष; 7 शहरात ‘रोड शो’

इफ्फीचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष; 7 शहरात ‘रोड शो’ 

ऑनलाईन टीम / पणजी :

इफ्फीत यंदा रशिया भागीदार होण्याची शक्यता असून, सात मोठय़ा शहरांमध्ये ‘रोड शो’ करण्यात येईल. यंदा इफ्फीत विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. केंद्रीय माहिती तथा प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली.

इफ्फीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सुकाणू समितीची बैठक आज गोव्यात पार पडली. त्यानंतर केंद्रीय माहिती तथा प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला.

जावडेकर म्हणाले, यंदा 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर असे नऊ दिवस इफ्फी चालणार आहे. इफ्फीचे यंदाचे 50 वे वर्ष असल्याने विशेष उपक्रमांचे आयोजन आहे.इफ्फी यशस्वी करण्यासाठी देशातील सात मोठय़ा शहरांमध्ये ‘रोड शो’ करण्यात येईल. बिझनेस प्रदर्शनही असेल, जे फिल्म क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती देईल. यंदाच्या इफ्फीचे आणखी वैशिष्टय़ म्हणजे विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. सुकाणू समितीवर बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, सिद्धार्थ राय-कपूर, फिरोज अब्बास खान, सुभाष घई आदी मान्यवरांनी सहभाग घेण्याचे निश्चित केले आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील फिल्म क्षेत्रातील मान्यवर मोठय़ संख्येने उपस्थित राहतील. पुरस्कारांबद्दल बोलताना ते म्हणाले की ‘सुवर्ण मयूर साठी 40 लाख, रौप्य मयूर साठी 10 लाख तसेच उत्कृष्ट निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री आदींसाठी प्रत्येकी दहा लाख असे पुरस्कार असतील.

Related posts: