|Sunday, January 19, 2020
You are here: Home » Top News » नेपाळमध्ये अतिवृष्टी; 65 जणांचा मृत्यू, 38 जखमी 

नेपाळमध्ये अतिवृष्टी; 65 जणांचा मृत्यू, 38 जखमी  

ऑनलाईन टीम / काठमांडू :

 नेपाळला अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला आहे. वादळी वाऱयासह मुसळधार पावसामुळे नेपाळमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 65 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 38 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर 30 जण बेपत्ता आहेत.

मागील काही दिवसांपासून नेपाळमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नागरिकांच्या घरांसह सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. पावसामुळे आतापर्यंत 65 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूर आला असून दरड कोसळल्या आहेत. गावांमध्ये पाणी शिरले आहे. बेपत्ता लोकांचा शोध सुरु आहे. पूरग्रस्त भागात अन्न आणि गरजेचे साहित्य पोहोचवले जात आहे.

Related posts: