|Thursday, January 23, 2020
You are here: Home » उद्योग » आक्षेपार्ह संदेश करणाऱयांवर ‘व्हॉट्सऍप’ची करडी नजर

आक्षेपार्ह संदेश करणाऱयांवर ‘व्हॉट्सऍप’ची करडी नजर 

अकौंट डिलीटची मोहीम डिसेंबर 2019 पासून सुरू

त्तसंस्था/ सॅन फ्रांसिस्को

ग्लोबल मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सऍप आता मशीन लर्निंग तंत्रज्ञानाच्या मदतीने आक्षेपार्ह माहिती आणि संदेशमध्ये अपशब्द वापरणाऱया वापरकर्त्यांवर लक्ष ठेवणार आहे. तसेच अनेकवेळा नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर कारवाई करत त्यांचे अकौंट डिलीट केले जाणार आहेत. हे तंत्रज्ञान डिसेंबर 2019 पासून सुरू होईल. यामुळे 30 दिवसांत 20 लाख वापरकर्त्यांचे अकौंट डिलीट केले जातील, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीलाच नियमांचे उल्लंघन करणाऱयांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा दिला होता. जगभरात सुमारे 150 कोटी व्हॉट्सऍप वापरकर्ते आहेत. फेसबुकच्या अंतर्गत काम करणारी कंपनी व्हॉट्सऍपने सांगितले की, आम्ही हे तंत्रज्ञान खासगी संदेश पाठवण्यासाठी तयार करत आहोत. व्हॉट्सऍपला भरमसाठ संदेश पाठवणे आणि दुरुपयोग करण्यासाठी बनवले नाही. ऑटोमेटेड संदेशला थांबवण्यासाठी कारवाई केली जाईल, या अंतर्गत दर महिन्याला 20 लाख अकाउंट डिलीट केले जातील, असेही सांगण्यात आले आहे.

व्हॉट्सऍपवर शिवीगाळ करताना सावधान

व्हॉट्सऍप आता मशीन लर्निंग तंत्राने चिथावणीखोर संदेश व अपशब्द वापरणाऱयांना ओळखून काढणार आहे. सातत्याने सेवा व अटींचे उल्लंघन करणाऱयाचे अकौंट त्वरित काढून टाकण्यात येणार आहे. आम्ही हा प्लॅटफार्म गैरवापरासाठी तयार केला नाही. ऑटोमेटेड मेसेजिंग थांबवू तसेच दरमहा 20 लाख अकाउंटवर बंदी आणू, असे फेसबुक स्वामित्व असलेल्या व्हॉट्सऍपने सांगितले आहे. 

Related posts: