|Thursday, January 23, 2020
You are here: Home » उद्योग » भारतात लवकरच स्वदेशी ‘आयफोन’

भारतात लवकरच स्वदेशी ‘आयफोन’ 

तरुणवर्गासाठी खूशखबर : माफक किंमत राहण्याची शक्यता

त्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय बाजारात लवकरच ‘मेक इन इंडिया’मार्फत ‘आयफोन’ विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. ‘फॉक्सकॉन’च्या स्थानिक प्रकल्पातून ‘आयफोन’ पुढील महिन्यापासून सादर होण्याची शक्मयता वर्तविण्यात आली आहे. भारतात उत्पादन होत असल्याने या ‘आयफोन’ची किंमत आयात उपकरणांच्या तुलनेत कमी असणार आहे. ‘आयफोन’ची विक्री भारतीय बाजारात करण्यासाठी ‘ऍपल’ला काही परवानग्या मिळणे अद्याप बाकी आहे. ही औपचारिकता पूर्ण करण्यासाठी ऑगस्ट महिन्यापर्यंत वाट पहावी लागणार आहे.

‘आयफोन’चा वापर करण्यासाठी देशात मोठय़ा प्रमाणावर वापरकर्ते इच्छूक आहेत. मात्र, अधिक किंमतीमुळे त्यांना आयफोन खरेदी करणे शक्मय होत नाही. केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम ‘मेक इन इंडिया’ला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर ‘फॉक्सकॉन’च्या मदतीने भारतातून ‘ऍपल’ने युरोपीयन बाजारात ‘आयफोन’ची निर्यात करण्यास सुरुवात केली आहे.

आयफोनच्या उत्पादनास सुरुवात

‘फॉक्सकॉन’च्या बेंगळूर येथील प्रकल्पात तयार होणाऱया एकूण ‘आयफोन’पैकी 80 टक्के उपकरणांची निर्यात केली जाते. गेल्या वषीपासून या प्रकल्पात ‘आयफोन 6’ आणि ‘़आयफोन 7’च्या उत्पादनास सुरुवात केली.

Related posts: