|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग » 1 लाख कर्मचाऱयांना अमेझाँन देणार प्रशिक्षण

1 लाख कर्मचाऱयांना अमेझाँन देणार प्रशिक्षण 

ऑटोमेशन-आर्टिफिशियलसाठी प्रयत्न : 4.8 हजार कोटींचा होणार खर्च

त्तसंस्था\नवी दिल्ली

ई-कॉमर्समधील सर्वात मोठी कंपनी अमेझाँन येणाऱया सहा वर्षांत आपल्या 1 लाख कर्मचाऱयांना प्रशिक्षण देणार आहे. ऑटोमेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या वापरामुळे कंपनीकडून हा निर्णय घेण्यात आला असून, या प्रकल्पाला ‘अपस्किलंग-2025’ असे नाव देण्यात आले आहे.

अमेझाँनमधील कर्मचाऱयांना हे प्रशिक्षण ऐच्छिक असून, या आधारावरच त्यांना मोठे पद किंवा महत्त्वाची भूमिका देण्याचा निर्णय कंपनीकडून घेण्यात येणार आहे. कर्मचाऱयांना नवीन कौशल्य आत्मसात करण्याची गरज असल्याचे कंपनीने एका प्रसिद्धिपत्रकात स्पष्ट केले आहे. अमेझाँनकडून वेगवेगळय़ा विभागात काम करणाऱया कर्मचाऱयांना इतर कौशल्यांचेही प्रशिक्षण देणार आहे.

कंपनीच्या यशामध्ये सर्वाधिक वाटा आमच्या कर्मचाऱयांचा आहे. त्यामुळे कर्मचाऱयांसाठी अनेक चांगले पर्याय तयार व्हावेत यासाठी आम्ही त्यांना नवीन कौशल्याचे प्रशिक्षण देणार आहोत, असे अमेझाँनचे एचआर प्रमुख बेथ गालेटी यांनी सांगितले.

कर्मचाऱयांसाठी मशीन लर्निंग विद्यापीठ

अमेझाँन कर्मचाऱयांसाठी मशीन लर्निंग विद्यापीठ सुरू करणार असून, ‘अपस्किलिंग-2025’ या प्रकल्पाद्वारे तेथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जे कर्मचारी यात सहभागी होतील, त्यांचे 95 टक्के शुल्क कंपनीकडून जमा करण्यात येणार आहे. काही महिन्यांपूर्वी कर्मचारी संघटना आणि अमेझाँन यांच्यात मतभेद असल्याच वृत्त समोर आले होते. त्यामुळे कर्मचाऱयांची नाराजी दूर करण्याचा कंपनीचा हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे.