|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भारतीय वायुसेनेत गोमंतकीयांसाठी रोजगार मेळावा

भारतीय वायुसेनेत गोमंतकीयांसाठी रोजगार मेळावा 

प्रतिनिधी/ पणजी

 राज्यातीय युवकांसाठी भारतीय वायु सेनेत भरती होण्यासाठी सुवर्ण संधी आली असून खास गोमंतकीयांसाठी भारतीय वायु सेनेत मोठय़ा प्रमाणात रोजगार भरती केली जाणार आहे. 27 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट रोजी बांबोळी येथील मैदानावर ही भरती होणार आहे. गोमंतकीय युवकांनी याचा लाभ घ्यावा असे यावेळी विंग कमांडर फर्नांडो दा कोस्टा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 बारावीमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त गुण घेऊन उर्त्तीण झालेले विद्यार्थी तसेच 19 जुलै  1999 ते 1 जुलै या कार्यकाळात जन्मलेले युवक या भरती प्रक्रीयेत सहभागी होऊ शकतात. 27 ऑगस्ट रोजी विज्ञान शाखा नसलेल्या उमेदवारांची भरती प्रकीया होणार आहे. तर 29 ऑगस्ट रोजी खास विज्ञान शाखेतील उमेदवारांची भरती प्रकीया होणार आहे. या भरती प्रक्रीयेमध्ये उमेदवाराची शारिरीक चाचणी केली जणार आहे. त्यानंतर इंग्रजीतून लेखी परिक्षा होणार आहे, तसेच मानसिक आरोग्यही तपासले जाणार आहे, असे कमांडकर फर्नांडो दा कोस्ता यांनी सांगितले.

 गोमंतकीय युवक भारतीय वायु सेनेत यायला घाबरत असल्याने पालकांनी त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. राष्ट्रीय सेवा करताना आम्हाला खूप मान सन्मान मिळत असतो. भारतीय वायु सेनेत काम केल्यावर सर्व राष्ट्रीय पातळीवरील सुविधा उपलब्ध होत असतात. पगारही भरघोस असतो. आरोग्य विमा शिक्षण तसेच अन्य विविध सुविधा सहज मिळतात त्याचप्रमाणे समाजात एक चांगला मान मिळत असतो. भारतीय वायु सेना खास गोमंतकीयासाठी ही रोजगार भरती घेऊन आली आहे. यात फक्त गोमंतकीय युवक सहभागी होऊ शकतो. त्यामुळे गोमंतकीय युवकांनी न घाबरता या सेवेत रुजू होऊन देशाची सेवा करावी, असे कमांडर फर्नांडो दा कोस्टा यांनी सांगितले यावेळी निवृत्त सेना अधिकारी अनंत जोशी तसेच माहिती अधिकारी जॉन आगियार उपस्थित होते.

Related posts: