|Friday, December 13, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » कुलभूषण जाधव प्रकरणी भारताचा विजय

कुलभूषण जाधव प्रकरणी भारताचा विजय 

आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तानला चपराक, फाशीला स्थगिती, पुनर्विचाराची सूचना

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

पाकिस्तानने खोटय़ा आरोपांखाली फाशीची शिक्षा ठोठावलेले भारताचे नागरीक कुलभूषण जाधव यांच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताच्या बाजूने निकाल दिला आहे. हा भारताचा मोठाच विजय असून पाकिस्तान तोंडघशी पडला आहे. जाधव यांच्यावरील अभियोग पुन्हा चालवावा, त्यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती द्यावी आणि त्यांना भारतीय उच्चायुक्तांशी संपर्क करू द्यावा असा आदेश न्यायालयाने दिला आहे. भारतात त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांची बाजू ज्येष्ठ विधितज्ञ हरीष साळवे यांनी मांडली होती.

कुलभूषण जाधव यांना 3 मार्च 2016 या दिवशी पाकिस्तानने अन्यायाने अटक केली होती. ते इराणमध्ये व्यापारासाठी गेले असताना त्यांना तेथे पकडण्यात येऊन पाकमध्ये नेण्यात आले. त्यांच्यावर हेरगिरी आणि हिंसाचार घडविल्याचे खोटे आरोप करण्यात आले. तेथील लष्करी न्यायालयाने सर्व आंतरराष्ट्रीय नियम धाब्यावर बसवून त्यांना बनावट सुनावणीत फाशीची शिक्षा ठोठावली होती. जाधव हे भारतीय नौदलाचे माजी अधिकारी आहेत.

मान्यवरांकडून आनंद व्यक्त

त्यांच्या सुटकेसाठी भारताने हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली. या न्यायालयात बुधवारी निकाल देण्यात आला असून त्यात पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय नियमांचा भंग केल्याचे ताशेरे झाडण्यात आले आहेत. जाधव यांना न्याय मिळाला असून त्यांच्या सुटकेसाठी आता पाकिस्तानवर आणखी दबाव आणण्यास  भारत सज्ज झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी विदेश व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी या निकालाचे स्वागत केले आहे. काँगेस नेते पी. चिदंबरम यांनी आनंद व्यक्त केला. जगभरातूनही अभिनंदनाच्या प्रक्रिया येत आहेत.

15 विरूद्ध 1 असा निकाल

या प्रकरणाची सुनावणी 16 न्यायाधीशांच्या पीठासमोर झाली होती. बुधवारी यापैकी 15 न्यायाधीशांनी भारताच्या बाजूने तर एका न्यायाधीशाने विरोधात मत दिले. पाकिस्तानला हा मोठा दणका असून त्याच्यावर आता दबाव वाढणार आहे. जाधव यांच्याविरोधातील लष्करी न्यायालयाची कारवाई पारदर्शी नव्हती. त्यांना पाकमधील भारतीय उच्चायोगाशी संपर्क करण्याची संधी नाकारण्यात आली. अभियोग घाईघाईने चालविण्यात आला, असा ठपका निकालात ठेवण्यात आला आहे. पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड पडला अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 

घटनाक्रम….

ड 3 मार्च 2016 : जाधव यांना हेरगिरीच्या आरोपावरून इराणमधून अटक

ड 26 मार्च 2016 : त्यांच्यावरील आरोप खोटे असल्याचा भारताचा दावा

ड 29 मार्च 2016 : त्यांना भारतीय उच्चायोगाशी संपर्क संधी नाकारली

ड 10 एप्रिल 2016 : पाक लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली

ड 15 एप्रिल 2016 : पाककडून भारताच्या हेरगिरीचा जगभरात कांगावा

ड 8 मे 2017 : न्यायासाठी भारताकडून आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव

ड 9 मे 2017 : आंतरराष्ट्रीय न्यायालयाची फाशीच्या शिक्षेला स्थगिती

ड 15 मे 2017 : आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताचा जोरदार युक्तीवाद

ड 22 जून 2017 : जाधवांकडून पाक राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज सादर

ड 10 नोव्हेंबर 2017 : जाधवांची पत्नीशी भेट घडविण्याचा पाकचा प्रस्ताव

ड 8 डिसेंबर 2017 : पत्नी आणि आईला भेटण्यासाठी पाकची अनुमती

ड 25 डिसेंबर 2017 : पाकमध्ये जाधवांची आई, पत्नीचा घोर अपमान

ड 18 फेब्रुवारी : आंतरराष्ट्रीय न्यायालयात चार दिवसांची सुनावणी सुरू

ड 4 जुलै 2019 : 17 जुलैला निकाल देण्याची न्यायालयाची घोषणा

ड 17 जुलै 2019 : आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताच्या बाजूने निकाल

 

Related posts: