|Monday, February 17, 2020
You are here: Home » Top News » दिल्लीत 600 कोटींचे हेरॉईन जप्त; रिकाम्या गोण्यांमधून तस्करी

दिल्लीत 600 कोटींचे हेरॉईन जप्त; रिकाम्या गोण्यांमधून तस्करी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

हेरॉईनच्या बेकायदेशीर फॅक्टरीचा दिल्ली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. लाजपत नगर भागात हा छापा टाकून पोलिसांनी 600 कोटींची 150 किलो हेरॉईन तसेच पाच लक्झरी कार, दोन पिस्तूल, आणि 20 काडतुसे जप्त केली.

या प्रकरणी शिनवारी रहमत गुल (30) आणि अख्तर मोहम्मद शिनवारी (31) या अफगाणच्या नागरिकांना अटक करण्यात आली आहे. या फॅक्टरीचा संबंध थेट तालिबानशी संबंध आढळून आला आहे. पोलिसांनी 600 कोटींचे हेरॉईन जप्त केले आहे. ही टोळी रिकाम्या गोण्यांतून हा अमली पदार्थ अफगानिस्तानहून दिल्लीला आणत होती.

मिळालेल्या माहितीनुसार, रिकाम्या गोण्यांमधून तब्बल 5 हजार कोटींहून जास्तीचे हेरॉईन परदेशातून भारतात आणण्यात आले आहे. हा तस्करीचा प्रकार पाहून दिल्लीचे पोलिसही चक्रावले आहेत. अफगाणिस्तानमधून आयात केल्या जाणाऱया एका गोणीची किंमत तब्बल चार कोटी रुपये होती. तागाच्या या गोण्या पातळ हेरॉईनमध्ये बुडविल्या जात होत्या. नंतर त्या सुकवून दिल्लीला पाठविण्यात येत होत्या. या गोण्या रिकाम्याच घडी केलेल्या असायच्या. हा प्रकार त्यामुळे कोणाच्या लक्षातही आला नाही. या गोण्या दिल्लीतील फॅक्टरीमध्ये आणल्यानंतर त्या काही रसायनांमध्ये बुडवून विशिष्ट पद्धतीने हे हेरॉईन पावडर स्वरूपात काढले जात होते. यानंतर या गोण्या जाळल्या जात होत्या. एका गोणीतून कमीतकमी किलोभर हेरॉईन निघत होते. या हेरॉईनची किंमत 4 कोटी होती. हा तस्करीचा प्रकार नवा असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related posts: