|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » मुद्रांक जिल्हाधिकाऱयांना सापडेना दस्तऐवज

मुद्रांक जिल्हाधिकाऱयांना सापडेना दस्तऐवज 

प्रतिनिधी/ गोडोली

प्रांताधिकाऱयांच्या आवारात बस्तान मांडलेल्या पिटीशन रायटर,दस्त लेखनिक,मुद्रांक विक्रेत्यांची पत्र्याची शेड अनाधिकृत असल्याचे तहसिलदारांच्या चौकशीत समोर आले आहे.तर दुय्यम निबंधकांच्या इमारतीत दस्त लेखनिक आणि मुद्रांक विक्रेत्यांना बसायला फृकटात जागा आणि लाईट कोण आणि कशी दिली याबाबतीत काहीच पुरावा कार्यालयात सापछला नसल्याचे सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी तरूण भारत ला सांगितले.या कार्यालयाचे अधिकृत 32 मुद्रांक विक्रेते आणि 11 दस्त लेखनिक असून अनाधिकृतरित्या काही जण येथे टेबल टाकून काम करताना दिसतात.आता सह जिल्हा निबंधक आणि मुद्रांक जिल्हाधिकारी शासनाच्या जागेचा फुकटात गैरवापर आणि लाईटचा वापर करणारांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करणार याची उत्सुकता सातारकरांना लागली आहे.नागरिकांना लुटणाऱयांची बदमाशी आणि शासनाची फसवणूक करणाऱयांचा विषय तरूण भारतने पटलावर आणून त्याचा शेवट ही लवकरच होणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांच्या कडून व्यक्त होत आहे.

        सातारा प्रांताधिकारी कार्यालयाच्या परिसरात फृकटची जागा आणि लाईटचा वापर करत पिटीशन रायटर,दस्त लेखनिक,मुद्रांक विक्रेत्यांनी वर्षानुवर्षे बस्तान मांडलेले आहे.पत्र्याची शेड टाकून प्रत्येकाच्या डोक्यावर पंखा,परवाना एकाचा असताना चार चार जण काम करतात,परवाना धारक नसताना त्योन sठेवलेली माणसे काम करतातना दिसतात.क्षुल्लक कामासाठी मनमानी दर घेत नागरिकांना लुटण्याचा धंदा करणारांची पत्र्याची शेड,कॅन्टिन,प्रवेशदारात छोटी शेड असून ती सारी बेकादेशीर आहेत.त्यांना कोणी,कधी,कशी जागा दिली याची कसलीच माहिती ना तहसिलदार, सह जिल्हा निबंधक आणि मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात हुडकून सापडली नाही.असे चौकशीअंती समोर आले आहे.

       सातत्याने पाठपुराव्याला यश

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा शहर अध्यक्ष राहूल पवार आणि कार्याकर्त्यांनी यावर आक्रमक भुमिका घेतली.त्याचा पाठपुरावा घेत हा विषय तडीस लावणार असल्याचे तरूण भारत शी बोलताना सांगितले.तर सामाजिक कार्यकर्ते अशोक लिपारे यांनी थेट जिल्हाधिकाऱयांच्या मार्फत हा विषय लावून धरला आहे.प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱयांनी सुध्दा या विषयावर पाठपुरावा केला असता जागा आणि लाईटचा वापर फुकटात होत असल्याचे निर्दशनास आले आहे.जागा कधीपासून कोणी दिली,लाईटचा वापर होत असताना अधिकाऱयांनी कारवाई का केली नाही,पत्र्याची शेड टाकताना विरोध केला नाही याबाबतीत लवकरच बस्तान उठवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी राहूल पवार आणि अशोक लिपारे हे कायदेशिर आणि गांधीगिरी मार्गाने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

             तावरेच्या कमाईची हाव नडली

पिटाशन रायटर असलेल्या दीपक तावरे यांने एका कामासाठी कोर्ट स्टॅम्प 100रूपये,त्याच्यावर काही मायना प्रिंट करण्यासाठी 100 रूपये आणि त्याची फि 100 असे किरकोळ कामासाठी तब्बल 300 रूपये घेतल्याने हा प्रकरणाची सुरूवात झाली.यातून हा अनाधिकृत वापर आणि अन्य बाबींची जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने प्रांताधिकारी,तहसिलदार, सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी माहिती घेतली,चौकशी केली असता सारा प्रकार चव्हाटयावर आला.अती कमाईची हाव असलेल्या तावरेच्या उचापतीने साऱयांना एवढया वर्षाचे मांडलेले बस्तान उठवावे लागले.त्याच्यामुळे यापुढे कामकाज नियमाच्या कचाटयात राहून सर्वांना करावे लागणार.

            नाममात्र फि मध्ये काम

फुकटात जागा आणि लाईटचा वापर करून दरपत्रकाशिवाय मनमानी दराने अमाप कमाई करणाऱया पिटीशन रायटर,दस्त लेखनिक,मुद्रांक विक्रेत्यांना जागा सोडण्याची वेळ तावरे मुळेच आली आहे.हि कारवाई होऊ नये,यासाठी काही जणांनी पालकमंत्री,जलमंदिर,सुरूची वाडयावर हेलपाटे मारले.मात्र प्रत्यक्षात नागरिकांना लुटनाऱयांना कोणीच थारा दिला नाही.उलट भविष्यात अनेक अडचणी निर्माण होणार असल्याचे लक्षात आले आहे.आधी डोक्यावरची सावली आणि पंख्याची गार हवा कायमची बंद झाल्यावर नियमांच्या अधिन राहून धंदा नाही तर सेवा करण्याची वेळ येणार आहे.नियमाप्रमाणे नाममात्र फि घेऊन आता नागरिकांची कामे होणार आहेत.

Related posts: