|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » Top News » ठाण्यात टेम्पो अपघातात एका मजूराचा मृत्यू, 21 जखमी

ठाण्यात टेम्पो अपघातात एका मजूराचा मृत्यू, 21 जखमी 

ऑनलाईन टीम / ठाणे :

मजुरांना घेऊन जाणाऱया टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो ब्रिजवर पलटी झाला. या दुर्घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला. तर 21 कामगार जखमी झाले आहेत. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील साकेत ब्रिजवर हा अपघात झाला.

आलम शौकत शेख (28, रा. मुंब्रा, ठाणे) असे मृत मजुराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेच्या हद्दीमध्ये वृक्ष फांद्या तोडणाऱया ठेकेदाराचा टेम्पो 21 कामगांराना घेऊन साकेत ब्रिजवरून नाशिक-मुंबई वाहिनीवरून जात होता. टेम्पो चालकाने मद्यप्राशन केले होते. त्यामुळे त्याचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो साकेत ब्रिजवर पलटी झाला. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.