|Friday, February 28, 2020
You are here: Home » Top News » वीज कोसळून धुळ्यात 2 तर भिवंडीत 1 महिला ठार

वीज कोसळून धुळ्यात 2 तर भिवंडीत 1 महिला ठार 

ऑनलाईन टीम / धुळे :

मुसळधार पावसाने राज्यात तिघांचे बळी घेतले आहेत. धुळय़ामध्ये वीज कोसळून दोन मुलांचा तर भिवंडी एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

मागील आठ ते दहा दिवस पावसाने राज्यात दडी मारल्यानंतर कालपासून पुन्हा मान्सून राज्यात सक्रिय झाला आहे. धुळे जिह्यातील पाडळदे या गावात झाडाववर ही वीज कोसळली. त्यावेळी एका झाडाखाली थांबलेल्या पंकज ज्ञानेश्वर राठोड (14) याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत लखन राठोड (6) आणि हितेश राठोड (10) हे दोघे जखमी झाले. तर धुळे जिह्यातील शिंदखेडा तालुक्मयातील खर्दे बुद्रुक येथील दुसऱया घटनेत दीपाली गिरासे (15) हिचा वीज कोसळून मृत्यू झाला.

तिसऱया घटनेत भिवंडी येथे झिडके गावाजवळ उंबरपाडा या आदिवासी वस्तीजवळ वीज कोसळून प्रमिला मंगल वाघे (20) या महिलेचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत प्रमिला यांच्या आई अलका वाघे (52) आणि बहिणीचा मुलगा विजय अजय बोंगे (4) जखमी झाले आहेत.

Related posts: