|Thursday, January 23, 2020
You are here: Home » Top News » वेस्टइंडीज दौऱयासाठी भारतीय संघ जाहीर

वेस्टइंडीज दौऱयासाठी भारतीय संघ जाहीर 

ऑनलाईन टीम / मुंबई :

वेस्टइंडीज दौऱयासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये महेंद्रसिंह धोनीला विश्रांती देण्यात आली आहे. तर श्रेयस अय्यर, मनिष पांडे, खलिल अहमद, नवदीप सैनी, राहुल चाहर, दीपक चाहर यासारख्या नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

3 ऑगस्टपासून सुरु होणाऱया वेस्टइंडीज दौऱयात भारताच्या टी-20, एकदिवसीय व कसोटी क्रिकेट संघाची एम. एस. के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय निवड समितीच्या बैठकीनंतर नव्या संघांची घोषणा करण्यात आली. विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा हा दौरा होणार असून टी-20 व एकदिवसीय सामन्यांमध्ये यष्टीरक्षक म्हणून महेंद्रसिंह धोनीची जागा ऋषभ पंत घेणार आहे. कसोटीसाठी पंत सोबत रिद्धिमान साहा याला अतिरिक्त यष्टीरक्षक म्हणून घेण्यात आले आहे. कर्णधार विराट कोहली हा देखील या बैठकीला उपस्थित होता.

विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत, कुलाल पांडय़ा, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चाहर, भुवनेश्वर कुमार, खलिल अहमद, दीपक चाहर, नवदीप सैनी, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी यांचा वनडे आणि टी-20 मध्ये समावेश करण्यात आला आहे.

Related posts: