|Monday, January 20, 2020
You are here: Home » Top News » 24 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान रंगणार टी-20 विश्वचषक स्पर्धा

24 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान रंगणार टी-20 विश्वचषक स्पर्धा 

 

ऑनलाइन टीम  /नवी दिल्ली : 

ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱया पुरुष टी 20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसंदर्भात आयसीसी ने एक महत्वाची घोषणा केली आहे. 2020 साली होणाऱया या विश्वचषकासाठी 18 ऑक्टोबर 2019 पासून सुरु होणार आहे. योगायोगाने टी 20 विश्वचषकातील पात्रता फेरीचे सामने देखील 18 ऑक्टोबर 2020 ला सुरु होणार असल्याने बरोबर 1 वर्ष आधी या सामन्यांच्या तिकीट विक्रीला सुरुवात होणार आहे.

महिला टी 20 विश्वचषक स्पर्धेतील सामन्यांसाठी तिकीट विक्रीला सुरुवात करण्यात आली आहे. महिला टी 20 विश्वचषक स्पर्धेची तिकिटे विकत घेणाऱया चाहत्यांना पुरुष विश्वचषक स्पर्धेसाठी तिकीट विक्री करताना प्राधन्य देण्यात येणार आहे. 21 फेब्रुवारी त 8 मार्च या कालावधीत सर्वोत्तम 10 संघ महिला विश्वचषक स्पर्धेत खेळणार आहेत. त्यानंतर 24 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2020 या कालावधीत पुरुष विश्वचषक स्पर्धा होणार आहे. दोनही स्पर्धांचा अंतिम सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे.

 

 

Related posts: