|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » अल्पवयीन मुलीवर अत्याचार आरोपीला 10 वर्षे शिक्षा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार आरोपीला 10 वर्षे शिक्षा 

सोलापूर/ प्रतिनिधी :

लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन अल्पवयीन मुलीला दमदाटी करुन अत्याचार केल्याप्रकरणी मोहोळ तालुक्यातील तरुणाला जिल्हा व सत्र न्यायाधीश यू.एल. जोशी यांनी गुरुवारी 10 वर्षे सक्त मजुरी सुनावली.

या खटल्याची हकीकत अशी की, सन 2017 मध्ये आरोपीने पिडीत तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. त्याठिकाणी दमदाटी करुन तिच्यावर आरोपीने अत्याचार केला. याप्रकरणी तरुणाविरुध्द मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करुन पोलिसांनी आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

या खटल्यात सरकारतर्फे एकूण 12 साक्षीदार तपासण्यात आले. पालकांच्या संमतीविना दमदाटी करुन पळवून नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेला आहे. अल्पवयीन मुलीवर होणाऱया अत्याचारात वाढ झालेली आहे. अशा प्रवृत्तीवर आळा बसण्यासाठी आरोपीस जास्तीत-जास्त शिक्षा ठोठावण्यात यावी असा युक्तीवाद सरकारतर्फे करण्यात आला. हा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीस शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारतर्फे ऍड. गंगाधर रामपुरे तर आरोपीतर्फे ऍड. धनंजय माने यांनी काम पाहिले.

Related posts: