|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आमदार मुश्रीफांवर ‘प्राप्तिकर’चे छापे

आमदार मुश्रीफांवर ‘प्राप्तिकर’चे छापे 

कागल :

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानासह दोन साखर कारखाने व कोल्हापूर, पुण्यातील फ्लॅट आदी सहा ठिकाणी प्राप्तिकर विभागाच्या पथकांनी गुरुवारी सकाळी एकाचवेळी छापे टाकले. सकाळी सुरू झालेली ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान, या कारवाईमुळे जिल्हय़ासह दक्षिण महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. कागल, गडहिंग्लज तालुक्यात कार्यकर्त्यांनी राज्य सरकारचा निषेध केला.

       प्राप्तिकर विभागाच्या पथकाने गुरुवारी सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी कोल्हापूरसह कागल, मासा बेलेवाडी, गडहिंग्लज, कोल्हापूर आणि पुणे येथील निवासस्थान, फ्लॅट आणि साखर कारखान्यांचे कार्यालय येथे एकाचवेळी छापे टाकले. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱयांची पथके या ठिकाणी दाखल झाली. कारवाईची माहिती अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली होती. मुश्रीफ यांच्या कागल येथील गैबी चौक परिसरातील बंगल्यासमोर प्राप्तिकर अधिकाऱयांची वाहने आली. यानंतर काही तरी वेगळे असल्याची चर्चा सुरू झाली. अधिकाऱयांनी मुश्रीफ यांच्या निवासस्थानाचा ताबा घेतला. तपासणी आणि चौकशी सुरू केली.

 मुश्रीफ मुंबईहून आले आणि पाठोपाठ पथकही

आमदार मुश्रीफ कामानिमित्त गेली तीन दिवस मुंबईमध्ये होते. गुरुवारी सकाळी 7.40 वाजता ते कागल येथील आपल्या निवासस्थानी आले. त्यांना भेटण्यासाठी अनेक कार्यकर्ते तेथे प्रतीक्षा करत होते. त्यांची भेट घेऊन आमदार मुश्रीफ आवरण्यासाठी गेले होते. त्याचवेळी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱयांच्या कार 
मुश्रीफ यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या. अधिकाऱयांच्या पथकाने मुश्रीफ यांच्या निवासस्थानी प्रवेश केला. प्रथम अधिकाऱयांनी उपस्थित कार्यकर्त्यांना बाहेर जाण्याची सूचना केली. त्यानंतर कारवाईस प्रारंभ केला.

Related posts: