|Sunday, March 29, 2020
You are here: Home » क्रिडा » जमशेदपूर संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी स्पेनचे इरिओंडो

जमशेदपूर संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी स्पेनचे इरिओंडो 

वृत्तसंस्था / जमशेदपूर

इंडियन सुपरलिग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱया जमशेदपूर एफसी फुटबॉल संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी स्पेनचे ऍन्टोनिओ इरिओंडो यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

2019-20 च्या इंडियन सुपरलिग फुटबॉल हंगामात आता जमशेदपूर संघाला स्पेनच्या अनुभवी इरिओंडो यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. स्पेनमधील ला लिगा स्पर्धेत सहभागी होणाऱया विविध संघांना इरिओंडो यांचे मार्गदर्शन यापूर्वी लाभले होते. आपल्या 27 वर्षांच्या प्रशिक्षक पदाच्या कारकीर्दीत स्पेनमधील अनेक फुटबॉल क्लबना त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे. आपल्या वैयक्तिक फुटबॉल कारकीर्दीत 65 वर्षीय इरिओंडो यांना  985 सामन्यांचा अनुभव आहे. त्याचप्रमाणे जमशेदपूर एमसी संघाने अल्फोन्सो टॅबेरेनी यांची गोल्डरक्षक प्रशिक्षक तर लुईस यांची तंदुरूस्ती प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

Related posts: