|Thursday, December 12, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » लहान बहिणीसाठी बलिदान

लहान बहिणीसाठी बलिदान 

वृत्तसंस्था/ दमास्कस

रशियाच्या हल्ल्यांमुळे सीरियातील नागरी वस्तींची स्थिती दयनीय झाली आहे. मागील 10 दिवसांमध्ये उत्तर-पश्चिम सीरियाच्या रुग्णालय, शाळा, बाजारपेठांवर झालेल्या हवाई हल्ल्यांमध्ये 26 मुलांसह 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अशाच एका हल्ल्यात  5 वर्षीय मुलगी स्वतःच्या 7 महिने वयाच्या छोटय़ा बहिणीचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात मृत्युमुखी पडली आहे.

रशियाच्या हल्ल्यामुळे इमारतीचा एक हिस्सा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. या इमारतीत राहणाऱया कुटुंबातील रिहाम अल-अब्दुल्ला या मुलीने प्राणांची आहुती देत छोटी बहिण तुक्काचा जीव वाचविला आहे. पाच वर्षीय रिहामने तुक्काला पकडून ठेवले होते. जखमी रिहामला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आहे. रिहामची छोटी बहिण तुक्कावर उपचार सुरू आहेत.

नागरी भागांवर जाणूनबुजून हल्ले करणे युद्ध गुन्हा असल्याचे विधान संयुक्त राष्ट्रसंघाचे मानवाधिकार प्रमुख मिशेल बाचेलेट यांनी केले आहे. त्यांनी जगाच्या सर्वात शक्तिशाली देशांच्या नेतृत्वाच्या अपयशावर टीका केली आहे.

Related posts: