|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » Top News » गणेश नाईक यांनी पक्षाची वाट लावली : जितेंद्र आव्हाड

गणेश नाईक यांनी पक्षाची वाट लावली : जितेंद्र आव्हाड 

ऑनलाईन टीम /ठाणे : 

राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपामध्ये जाण्याच्या वाटेवर असलेल्या गणेश नाईक यांच्यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घणाघाती टीका केली आहे. गणेश नाईक यांनी पक्षाची वाट लावली. नाईक हे पाच वर्षांत पक्ष साफ करतील आणि ऐनवेळी सोडून जातील, असे मी वारंवार सांगत होतो, मात्र पक्षाने त्याकडे दुर्लक्ष केले, अखेरीस आज मी ज्याची भीती व्यक्त केली होती तेच घडत आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

भाजपाच्या वाटेवर असलेल्या गणेश नाईक यांच्यावर जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार शरसंधन केले. ते म्हणाले, गणेश नाईक 2014 मध्येच राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार होते. जेव्हा शरद पवार यांचे ऑपरेशन सुरू होते. तेव्हा गणेश नाईक हे गुप्त बैठका घेण्यात गुंतले होते. त्यांच्या या हालचालींविषयी मी पक्षाला वारंवार सुचित केले. मात्र पक्षाने माझ्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले.

 

Related posts: