|Sunday, December 15, 2019
You are here: Home » leadingnews » मुंबईत पावसाचा जोर ओसरला

मुंबईत पावसाचा जोर ओसरला 

ऑनलाईन टीम / मुंबई : 

मागील दोन दिवसांपासून मुंबईसह उपनगरात कोसळणाऱया दमदार पावसाचा जोर आज दुपारनंतर कमी झाला आहे. ठाणे, कल्याण, अंबरनाथ-बदलापूर भागात पाऊस सुरुच आहे. भारतीय वेधशाळेने पुढील काही तास मुंबई आणि नजिकच्या परिसरात वादळी वाऱयासह पावसाची शक्मयता वर्तवली आहे.

पावसाचा जोर कमी झाल्याने सकाळपासून ठप्प झालेली मध्य रेल्वेची ठाणे ते कल्याण अप व डाउन मार्गावरील टेन धीम्या गतीने सुरु करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे शहराच्या सखल भागात साचलेले पाणी मात्र अद्याप कमी झाले नाही. रेल्वे आणि विमान वाहतूकही अद्याप विस्कळीत आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. पावसाच्या जोरदार बॅटींगमुळे मिठी नदीची पातळी वाढल्याने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला देखील याचा फटका बसला आहे. मुंबईच्या समुद्रात 4.5 मी. उंचीच्या लाटा उसळण्याची शक्मयता आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱयावर न जाण्याचा सल्ला पोलीस प्रशासनाने दिला आहे.

नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, अशी विनंती प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. खरबदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफच्या आठ पथकांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Related posts: