जम्मू-काश्मीरमध्ये कलम 144 लागू

ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज मध्यरात्रीपासून श्रीनगर आणि राज्यातील इतर काही जिह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. थोडय़ाच वेळात यासंदर्भातील मंत्रिमंडळाची बैठक सुरु होणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव राज्यातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.
काश्मीरच्या प्रश्नावर मोदी सरकारच्या मनात काय चाललंय? याचे उत्तर काही तासांत समजणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच सुरु झाली आहे. या बैठकीत काश्मीर खोऱयातील प्रश्नावर चर्चा आणि त्यावर निर्णय होण्याची शक्मयता आहे. या बैठकीत घेतलेला निर्णय आणि काश्मीरमधील सध्याची परिस्थिती यावर सरकार संसदेत उत्तर देणार आहे.
काश्मीरमध्ये होणाऱया हालचाली आणि रविवारी मध्यरात्री काश्मीरमधील नेते माजी मुख्यमंत्री उमर अब्दुला आणि मेहबूबा मुफ्ती यांना नजरबंद करण्यात आले आहे. तर रात्री उशीरा राज्यपालांनी डीजीपी आणि अन्य वरि÷ अधिकाऱयांची बैठक घेतली. रविवारी रात्रीपासून काश्मीरमधील हालचालींना वेग आला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. ज्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, केंद्रीय गृह सचिव यांच्यासमावेत गुप्तचर खात्याचे अधिकारीही उपस्थित होते.