|Sunday, December 15, 2019
You are here: Home » leadingnews » पावसाचे थैमान; पुणे-बेंगळूरू महामार्ग शिरोळनजीक केला बंद

पावसाचे थैमान; पुणे-बेंगळूरू महामार्ग शिरोळनजीक केला बंद 

ऑनलाईन टीम / पुणे :

मागील चार दिवसांपासून कोसळणाऱया मुसळधार पावसाने सातारा, सांगली आणि कोल्हापूरातील नद्यांना पूर आला आहे. पंचगंगा नदीला पूर आल्याने शिरोळनजीक महामार्गावरील पुलावर पाणी साचले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बेंगळूरूकडे जाणारी वाहतूक किणी टोलनाक्मयाजवळ थांबविण्यात आली आहे.

सातारा, सांगली, कोल्हापूर या जिह्यातील पंचगंगा, कृष्णा, कोयना, वारणा अशा चारही नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सांगलीत महापूराचा धोका आहे. सांगली जिह्यातील कृष्णा व वारणा नद्यांचे पाणी लोकवस्त्यांमध्ये शिरल्याने प्रमुख मार्ग बंद होण्याबरोबर हजारो लोकांच्या स्थलांतराचे काम सुरू झाले आहे. 107 गावांचा संपर्क तुटला असून, सांगली-इस्लामपूर मार्ग बंद झाला आहे. सातारा जिह्याच्या पश्चिम भागातही पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोयना नदीने धोक्मयाची पातळी ओलांडली आहे. पुराचा फटका बसलेल्या शिरोळ, हातकणंगले, करवीर, राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी, आदी सहा तालुक्मयांतील पाच हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

Related posts: