|Saturday, February 22, 2020
You are here: Home » Top News » देशात लवकरच धावणार अंडरवॉटर ट्रेन

देशात लवकरच धावणार अंडरवॉटर ट्रेन 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पाण्याखालून धावणाऱया भारतातील पहिल्या ट्रेनचे लवकरच आगमन होणार आहे. ही टेन सॉल्टलेक सेक्टर 5 ते हावडा मैदानापर्यंत धावण्यासाठी जवळपास तयार आहे. कोलकात्यातील हुगळी नदीखालून ही टेन धावणार आहे.

पाण्याखालून धावणाऱया ट्रेनचे मार्ग दोन टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यातील पहिला टप्पा लवकरच प्रवाशांसाठी खुला केला जाणार आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली.

या टेनला पाण्यापासून वाचवण्यासाठी उच्चस्तरीय सुरक्षा कवच लावण्यात आले आहे. तसेच नदीच्या मधून जाणारा हा मार्ग 520 मीटर लांब आणि 30 मीटर खोल आहे. नदीखालून टेनला हे अंतर पार करण्यासाठी 60 सेकंदाचा वेळ लागणार आहे. ही टेन लवकरच सुरू होणार असल्याचेही गोयल यांनी सांगितले.

Related posts: