71 वर्षे जुना आरके स्टुडिओ अखेर जमीनदोस्त

ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबई येथील चेंबूरस्थित 71 वर्षे जुना आरके स्टुडिओ आता केवळ कागदावर राहिला आहे. गुरूवारी आरके स्टुडिओ अखेर जमीनदोस्त करण्यात आला. आता रिअल इस्टेटमधील दिग्गज असलेल्या गोदरेज प्रॉपर्टीजने आरके स्टुडिओ परिसर आपल्या नावे केला. स्टुडिओची स्थापना 1948 मध्ये अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते राज कपूर यांनी केली होती.
आरके स्टुडिओ विक्री करण्याचा निर्णय कपूर फॅमिलीने आधीपासून घेतला होता. गेल्या वषी ऑगस्टमध्ये कपूर फॅमिलीने आरके स्टुडिओ विकण्याचा खुलासा केला. ‘शो मॅन’ नावाने प्रसिध्द असणारे अभिनेते राज कपूर यांनी अधिकतर चित्रपटांचे शूटिंग याच स्ìgडिओत केले. हा स्ìgडिओ जवळपास 2 एकर परिसरात होता. या स्टुडिओची देखभाल करणे, इतके सोपे नव्हते. त्यासाठी येणारा खर्चही अधिक होता.