|Monday, December 9, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

रवि. 11 ते 17 ऑगस्ट 2019

मेष

सिंह राशीत शुक्र, रवि प्रवेश, चंद्र, नेपच्यून लाभयोग होत आहे. या सप्ताहात तुमची बरीच कामे होतील. धंद्यात सुधारणा करता येईल. राजकीय, सामाजिक कार्यातील तणाव, गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. विरोधकांना त्यांचा चुका दाखवता येतील. घरातील वातावरण आनंदी राहील. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नावलौकीक मिळेल. कोर्टकेस प्रगतिपथावर राहील. शेतकरी वर्गाला थोडा दिलासा मिळेल.


वृषभ

सिंह राशीत शुक्र, रवि प्रवेश, चंद्र, बुध प्रतियुती होत आहे. रविवार, सोमवार समस्या येईल. प्रवासात सावध रहा. दुखापत संभवते. राजकीय, सामाजिक कार्यास कायद्याचे पालन करा. योजनांच्या मागे राहून त्यांना गती द्या. घरातील चिंता नकोशी वाटेल. विशेषत: मुले मनमानी करतील. कला, क्रीडा क्षेत्रात कौतुक होतील. कोर्टकेसमध्ये आशादायक परिस्थिती राहील. नोकरीत काम वाढेल.


मिथुन

सिंह राशीत शुक्र, रवि प्रवेश, चंद्र बुध प्रतियुती होत आहे. मंगळवार, बुधवार धावपळ होईल. खर्च वाढेल. धंद्यात जम बसेल. कंत्राट मिळेल. थकबाकी वसूल करता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा मिळेल. लोकांच्या उपयोगी पडेल. घरात शुभ समाचार मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. नवीन ओळख तुम्हाला प्रेरणादायी वाटेल. कोर्टकेस जिंकाल. शेतकरी वर्गाला फायदा होईल.


कर्क

सिंह राशीत शुक्र, सूर्य प्रवेश, चंद्र गुरु लाभयोग होत आहे. तुमचे बोलणेच तुम्हाला अडचणीत आणू शकेल. दिलेला शब्द बदलल्यामुळे वैर वाढू शकते. गुप्तकारवाया होतील. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा राहील. परंतु त्यावर हातोडा मारण्याचा प्रयत्न जोरदार होऊ शकतो. प्रवासात सावध रहा. धंदा वाढेल. खर्च वाढेल. नोकर माणसे गद्दारी करण्याची शक्मयता आहे. स्पर्धेत प्रगती होईल. कोर्टकेसपासून सावध रहा.


सिंह

तुमच्याच राशीत शुक्र, सूर्य प्रवेश, चंद्र, मंगळ प्रतियुती होत आहे. मंगळवार, बुधवार समस्या येईल. धंद्यात जमून येत असलेले काम रेंगाळण्याची शक्मयता आहे. मनावर दडपण येईल. राजकीय, सामाजिक कार्यास द्विधा मनस्थितीत रहाल. समोरच्या व्यक्तीचे डावपेच नकोसे वाटतील. वाटाघाटीत तणाव होईल. कला, क्रीडा क्षेत्रात उशिरा यश मिळेल. घरात नाराजी होईल. आर्थिक व्यवहार सावधपणे करा.


कन्या

सिंह राशीत शुक्र, सूर्य प्रवेश, चंद्र, बुध प्रतियुती होत आहे. शनिवार तुमच्या सर्वच ठिकाणी अडचणी वाढण्याची शक्मयता आहे. धंद्यात विलंबाने यश मिळेल. सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या विरोधात बोलले जाईल विरोध व मनस्ताप होईल. घरात वाद होईल. वृद्ध व्यक्तीची काळजी घेण्याचे काम वाढेल. स्पर्धेत मेहनत घ्या. कोर्टकेस कठीण वाटेल.


तुला

सिंह राशीत शुक्र, सूर्य प्रवेश, सूर्य,शुक्र युती होत आहे. धंद्यात मोठे काम मिळेल. फायदा होईल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. नुकसान भरून काढता येईल. घरात शुभ समाचार मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात वर्चस्व वाढेल. मोठी कामगिरी पूर्ण कराल. वरि÷ांची मर्जी वाढेल. नोकरीत फायदेशीर घटना घडेल. कला, क्रीडा, साहित्यात चमकाल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. कोर्टकेस जिंकाल.


वृश्चिक

सिंह राशीत शुक्र, रवि प्रवेश, चंद्र,शुक्र प्रतियुती होत आहे. धंद्यात जम बसेल. प्रयत्न करा. मागील येणे वसूल करा. संसारात सुखद घटना घडेल. अविवाहितांना चांगली स्थळे मिळतील. संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करा. राजकीय- सामाजिक  कार्यात प्रभाव वाढेल. लोकप्रियता मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रात नावलौकीक मिळेल. परदेशात जाल. नोकरीत सरशी होईल. केस संपवा.


धनु

सिंह राशीत शुक्र, सूर्य प्रवेश, बुध, हर्षल केंद्रयोग होत आहे. तुमचे मन स्थिर राहण्यास मदत होईल. धंद्यात चांगली घटना घडेल. दिलासा मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगतीची संधी मिळेल. प्रति÷ा वाढण्यास सुरुवात होईल. घरातील वातावरण ठीक होण्यास सुरुवात होईल. कला, क्रीडा क्षेत्रात परिचय होईल. नवे कामाचे आश्वासन मिळेल. कोर्टकेसमध्ये सौम्य धोरण ठेवा उतावळेपणा नको.


मकर

या सप्ताहाच्या शेवटी सिंह राशीत शुक्र, सूर्य प्रवेश करीत आहे. धंद्यात फायदेशीर काम सुरुवातीलाच मिळवा. गोड बोलून कामगार वर्गाला सांभाळून ठेवा. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात रविवार, सोमवार क्षुल्लक अडचण येईल. तुम्ही ठरविलेले कार्य वेळेस पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. सोसायटीतील कामे रेंगाळत ठेवू नका. प्रवासात घाई नको. राग वाढेल. कला,क्रीडा क्षेत्रात ओळखी होतील. मोठे आश्वासन मिळेल.


कुंभ

सिंह राशीत शुक्र, सूर्य प्रवेश करीत आहे. नारळी पौर्णिमेच्या दिवशी धावपळ होईल. मनाविरुद्ध घटना घडू शकते. घरात तणाव होईल. राजकीय, सामाजिक कार्यात दूर दृष्टिकोन ठेवा. रागाने बोलणे  केल्यास मनस्ताप  वाढेल. शेजारी भांडण वाढवेल. धंद्यात खर्च वाढेल. आर्थिक व्यवहारात विलंब होऊ शकतो. नोकरीत तडजोड स्वीकारावी लागेल. कला, क्रीडा क्षेत्रात स्पर्धा वाढेल. कौतुक होईल.


मीन

सिंह राशीत शुक्र, रवि प्रवेश करीत आहे. महत्त्वाची कामे सप्ताहाच्या सुरुवातीला करा. धंद्यात तणाव होईल. मोठे काम घेऊन ठेवा. कुणालाही दुखवणे योग्य ठरणार नाही. नोकरीत  वरि÷ांच्या मर्जीनुसार निर्णय घ्यावा लागेल. कला, क्रीडा स्पर्धेत प्रगती होईल. घरात संमिश्र स्वरुपाचे वातावरण राहील. मेहनत जास्त घ्यावी लागेल. अरेरावी केल्यास चांगले संबंध बिघडतील.

Related posts: