|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शिक्षक समितीच्या पतसंस्थेचे कार्य उल्लेखनिय

शिक्षक समितीच्या पतसंस्थेचे कार्य उल्लेखनिय 

  प्रश्न सोडवण्याचे शिवेंद्रराजेंचे आश्वासन

वार्ताहर/ कास/कुडाळ

आज शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे तरुण शिक्षक समितीच्या पाठीशी आहेत. संघटनेत उदयजी शिंदे यांना शिक्षक समितीने राज्याची धुरा दिली असून हा सर्व जावळीकरांचा सन्मान आहे. असे प्रतिपादन आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.

कुडाळ (ता. जावली) येथे तालुक्यातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचा गुणगौरव आणि नूतन कार्यकारिणीचा सत्कार  कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. 

कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदयजी शिंदे होते. चेअरमन धिरेश गोळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी तालुक्यातील इयत्ता 5 वी तील सन 2018,2019 मध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. राजकीय पटलावर अनेक बदल घड़त राहतात. प्रवाहाच्या विरोधात राहून तालुक्याचे प्रश्न सुटणार नाहीत. बदलाची दिशा समजूनच योग्य निर्णय घेतला आहे. यापुढेही शिक्षक समितीला माझे सर्वोपतरी सहकार्य राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.

पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्ष दिपक पवार यांनी समितीच्या कार्याचे कौतुक केले. याप्रसंगी मनिषा शेलार  व सरचिटणिस स्वाती बारटक्के यांचा  मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष शंकर देवरे, सुरेश चिकणे, तानाजी आगुंडे यांनीही आपले विचार व्यक्त केले. शामराव जुनघरे व नितीन जाधव यांनी सूत्रसंचालन केले नितीन मोहिते यांनी आभार मानले. या कार्यक्रमास माजी सभापती अरुणाताई शिर्के, शिक्षक बँक संचालक किरण यादव, कोरेगाव, वाई, कराड तालुक्यातून सदस्य उपस्थित होते.