|Sunday, December 15, 2019
You are here: Home » Top News » संकटकाळी बॉलिवूड कलाकार कुठे गेले?

संकटकाळी बॉलिवूड कलाकार कुठे गेले? 

ऑनलाईन टीम / मुंबई :

महापुराने वेढलेल्या सांगली आणि कोल्हापूरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संपूर्ण महाराष्ट्र सरसावला आहे. मात्र, महाराष्ट्र ही माझी कर्मभूमी असल्याचे वारंवार सांगणारे बॉलिवूड अभिनेते कुठे गेले?, असा प्रश्न मनसने उपस्थित केला आहे. मनसेने याबाबत ट्विट केले आहे.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. मराठी कलाकारही यामध्ये मागे नाहीत. मात्र, महाराष्ट्रातून जगभर पसरणारा बॉलिवूड कुठे गेला? बॉलिवूडकरांना हे संकट दिसत नाही का? असा प्रश्न मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी विचारला आहे. ‘लानत है उनपर, जिनके पास दानत नही है….’ असे म्हणत मनसेने बॉलिवूड कलाकारांना फटकारले आहे.

ज्या प्रेक्षकांच्या जीवावर कलाकार आपले खिशे भरतात तेच प्रेक्षक जेव्हा दुःखात आहेत, तेव्हा त्यांना सावरण्यासाठी पुढे का आले नाहीत? बॉलिवूड कलाकरांना कर्मभूमीचा विसर पडलाय, असे खोपकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Related posts: