|Thursday, February 20, 2020
You are here: Home » Top News » पुरबळींची संख्या 43 वर, आतापर्यंत 4,74, 226 नागरिकांचे स्थलांतर

पुरबळींची संख्या 43 वर, आतापर्यंत 4,74, 226 नागरिकांचे स्थलांतर 

पुणे / प्रतिनिधी : 

पुणे विभागांमध्ये आत्तापर्यंत पुरामुळे 43 जणांचे बळी गेले आहेत. यामध्ये 21 बळी सांगली जिह्यातील असून सात जणांचा कोल्हापूर जिह्यातील नागरिकांचा समावेश आहे. याचबरोबर सातारा आणि पुणे जिह्यातही प्रत्येकी सात जणांचा समावेश आहे. तसेच सोलापूर जिह्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी आज, सोमवारी पत्रकार परिषदेत दिली

म्हैसकर म्हणाले, की पुणे विभागामध्ये पडलेला पाऊस रेकॉर्डब्रेक आहे. यामध्ये अनेक प्रकारची हानी झाली आहे रविवारी दोन मृतदेह सांगली जिह्यामध्ये सापडले. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही तर तीन जण बेपत्ता आहेत. बेपत्ता असलेल्या व्यक्तींमध्ये एक व्यक्ती सांगली तर एक व्यक्ती कोल्हापूर आणि एक व्यक्ती सातारचे आहेत. आतापर्यंत 4,74, 226 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

 

Related posts: