|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पावसामुळे सिंधुदुर्ग एसटीचे दिड कोटींचे उत्पन्न बुडाले

पावसामुळे सिंधुदुर्ग एसटीचे दिड कोटींचे उत्पन्न बुडाले 

प्रतिनिधी / कणकवली:

सिंधुदुर्ग जिल्हय़ासह कोल्हापूर, सांगली, बेळगाव आदी भागात झालेल्या मुसळधार पावसानंतर रा. प. महामंडळाच्या वाहतूकीवरही त्याचा विपरित परिणाम झाला. अजूनही कोल्हापूर मार्गावरील वाहतूक गैबी, गारगोटीमार्गे सुरू आहे. उर्वरित वाहतूक आता पूर्वपदावर येत आहे. मात्र, या आठवडाभराच्या कालावधीत रा. प. महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाची सुमारे 5 लाख कि. मी. वाहतूक होऊ शकली नाही. त्यामुळे या विभागाचे जवळपास दिड कोटी रुपये उत्पन्न बुडून नुकसान झाल्याची माहिती रा. प. महामंडळाच्या सुत्रांकडून देण्यात आली.

सिंधुदुर्गसह कोल्हापूरमधील पावसाने कोल्हापूर, पुणे, सांगली, रत्नागिरी, बेळगाव, पणजी आदी भागातील वाहतूक ठप्प झाली होती. जिल्हय़ांतर्गत वाहतूकीवरही मोठा परिणाम झाला होता. त्यातच शेवटच्या दोन दिवसांत इंधन साठाही कमी झाल्याने अंतर्गत वाहतूकीवर परिणाम झाला होता. आता इंधन उपलब्ध झाले असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, सिंधुदुर्ग विभागातून दररोज सुमारे 1 लाख कि. मी. वाहतूक केली जाते. त्यातून या विभागाला दररोज सुमारे 25 ते 30 लाखांपर्यंत उत्पन्न मिळते. मात्र, गेल्या आठ दिवसांत या जिल्हय़ातून वाहतूक होणाऱया 5 लाख कि. मी. वाहतूकीवर त्याचा परिणाम झाला आहे. यातून सुमारे दिड कोटी रुपये उत्पन्न बुडाले असल्याची माहिती रा. प. महामंडळाच्या सुत्रांकडून देण्यात आली.

Related posts: