|Monday, December 9, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » हवामान विभागासाठी पंधरवडा परीक्षेचा

हवामान विभागासाठी पंधरवडा परीक्षेचा 

हवामान विभाग तारेवरील कसरत करत आहे.पावसाच्या युद्धपातळी काळात प्रत्येक निरीक्षण कार्यालयातील प्रत्येक घटक 24 तास सजग होते. जुलैचा गेला पंधरावडा हवामान विभागासाठी परीक्षेचा ठरला….

गेल्या 150 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव, हवामान मॉडेल्समध्ये होणाऱया तत्कालीन बदलाचा अभ्यास आणि बदलणाऱया पाऊस अंदाजाची जाण आणि अद्ययावत यंत्रणा यामुळे हवामान विभागाने चांगली कामगिरी केली. गेल्या 40 दिवसात काही जिल्हय़ांनी मोसमी पावसाची टक्केवारी पार केली. येणाऱया हवामानाच्या सिग्नल्समधून हवामान विभागाला इशारे देणे सोपे झाले. गुजरात, मुंबई महानगर  प्रदेशातील बदलापूर ते आताचे सांगली, कोल्हापूर, सातारा या जिह्यांमधील पावसाची निरीक्षणे वेळेआधीच देण्यात आली. हातघाई म्हणजे काय याचा अनुभव हवामान विभागाच्या प्रत्येक अधिकारी आणि नोंद करणाऱया घटकाने केला.

हवामान विभागाविरोधात होणारी नेहमीची ओरड यावेळी मात्र दिसून आली नाही. त्याचे कारण मागील पंधरवडय़ातील हवामानाची स्थिती होय.  यावेळी गुजरातपासून सांगली-साताऱयापर्यंत पावसाच्या उच्च नोंदी झाल्या. गेल्या 40 दिवसात काही जिह्यांनी मोसमी पावसाची टक्केवारी पार केली आहे. येणाऱया हवामानाच्या सिग्नल्समधून हवामान विभागाला इशारे देणे सोपे झाले. गुजरात, मुंबई महानगर प्रदेशातील बदलापूर ते आताचे सांगली, कोल्हापूर सातारा या जिह्यांमधील पावसाची निरीक्षणे वेळेआधीच देण्यात आली. मात्र, पावसाच्या युद्धपातळीवर †िस्थतीच्या काळात प्रत्येक निरीक्षण कार्यालयातील प्रत्येक घटक 24 तास सजग होते. जुलैचा प†िहला पंधरवडा हवामान विभागासाठी परीक्षेचा ठरला. हवामानाचा अंदाज करणे, त्यात पावसाचा अंदाज करणे ही प्रक्रिया सध्या क्लिष्ट झाली असून त्यासाठी अद्ययावत यंत्रणा असावी लागते. त्या तोडीची यंत्रणा सध्या राज्याच्या हवामान विभागाकडे आहे. त्यामुळेच बदलापूर, सांगली, सातारा ते गुजरातपर्यंतचे इशारे वेळेत देणे शक्य झाले. मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचा विस्तार गोव्यापासून गुजरातपर्यंत आहे. या विभागात अद्ययावत यंत्रणेमुळे तसेच अधिकाऱयांमुळे अंदाज आणि इशारे करणे सोपे झाले. जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरावडय़ात हवामान विभागाकडून सर्वाधिक रेड अलर्ट घोषित करण्यात आले. लगोलाग रेड अलर्ट घोषित करण्याची वेळ कदाचित हवामान विभागावर पहिल्यांदाच आली असेल. पावसाचा तडाखा गोव्यापासून गुजरातपर्यंत होता. गुजरात, मुंबई महानगर प्रदेशातील बदलापूर ते आताचे सांगली, कोल्हापूर सातारा हे जिह्यांमधील पावसाची निरीक्षण वेळेआधीच देण्यात आली. भारतीय हवामान विभागाचे मध्य महाराष्ट्र आणि कोकण प्रदेशातील कार्यालये आराम न करता हवामानाची माहिती सतत देत होते. यामुळे हवामानावर अवलंबून असलेल्या सेवांना काम करण्यास मदत झाली. यातच गेला पंधरावडा आव्हानाचा ठरला. विमान सेवा प्राधिकारण, मेटारॉलॉजिकल सेवा, कोस्टगार्ड, इंडियन नेव्ही, नागरी सेवा, डीएम प्राधिकरण, शेती आदी विभागांना हवामानाच्या माहितीची मदत झाली. पूरग्रस्त भाग आता सावरताना दिसून येत आहे. कोल्हापूर येथील विमानतळ मोठा नसला तरी सध्याच्या आपत्कालीन स्थितीत या †िठकाणी मदत करणारी विमाने सतत उतरत होती. त्यामुळे तेथील विमान सेवेला हवामानाचे इशारे सतत दिले जात होते. साधारणपणे प्रत्येक सेवांसाठी अंदाज देण्याचा कालावधी ठरलेला आहे. †िवमानसेवांना दर अर्धा तर औद्योगिक शहरांना सहा तासांनी पावसाचा अंदाज सांगितला जातो.

मध्य महाराष्ट्र तसेच कोकणातील हवामान विभागाची निरीक्षण कार्यालये रत्नागिरी, गोवा, हर्णै, कोल्हापूर, सांगली, सातारा, महाबळेश्वर तसेच नाशिक येथील माहितीमुळे पूरबाधित भागात सतर्कता मिळवून देणे शक्य झाले. येथील यंत्रणा निरीक्षणे नोंदवणे, अंदाज करणे, आणि हवामानाचे विश्लेषण करणे यावर भर देत होते. बदलत्या वातावरण स्थितीत हे आव्हानात्मक ठरत असले तरीही त्याचा फायदा झाला. येथील ऑब्जव्हरटीज केंद्रांमधून निरीक्षणे नोंदविण्याचे काम अद्यापही सुरू आहे. येथील पूरस्थिती सुधारली नाही. आपत्कालीन सेवा आणि मदत सेवांना हवामानाच्या माहितीची आवश्यकता आहे.

पाऊस नोंदीचा उच्चांक

गुजरातमधील बडोदा येथील तसेच नंदूरबार येथील पाऊस नोंद 200 ते 250 पर्यंत करण्यात आली होती. अशी उच्चांकी पाऊस नोंद या पावसाळ्याची ठळक वैशिष्ट ठरले. तर नाशिक मुंबई, रत्नागिरी, हर्णै, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि बदलापूर, ठाणे याठिकाणी उच्च पाऊस नोंदी दिसून आल्या. मुंबईतील मोसमी पावसाची टक्केवारी 10 ते 12 दिवसातच भरून आली. तर पुण्याला 140 टक्के पाऊस झाला. तसेच कोकणातील 2 हजार नोंदीची सरासरी 3000 वर गेली असल्याचे उल्लेखनीय ठरत आहे. 

त्या-त्या प्रदेशातील पावसाने सरासरी ओलांडून जाणे हे नोंद करण्यासारखे आहे. त्याचवेळी या पंधरावडय़ात ऑरेंज आणि रेड अलर्टचा अंदाज सतत करण्यात आला. रेड अलर्ट इशाऱयात पाऊस 200 मिमी पलीकडे जाणार असल्याचा अंदाज असतो. निरीक्षणांच्या मॉडेल्समुळे निरीक्षण नोंद येण्यापासून चौथ्या-पाचव्या दिवशी पावसाच्या स्थितीचा अंदाज करणे शक्य होते. विभागाचे हवामान मॉडेल्स चांगल्या†िरतीने काम केल्याने निरीक्षणे, अंदाज आणि इशारे देणे शक्य झाले. हवामान विभागाकडे अद्ययावत यंत्रणा उपलब्ध असल्याने अंदाज करणे शक्य झाले आहे. दक्षिण महाराष्ट्राचा हवामान अंदाज करणारे गोव्याचे रडार तर कोल्हापूर येथील रडार यांनी कोकण पट्टय़ासह सातारा भागातील पाऊस इशारा वेळीच दिला.

गेल्या पंधरवडय़ासाठी देण्यात आलेले इशारे हे फार कमी वेळेत देणे शक्य झाले. मात्र निरीक्षणांसाठी आणि तपशिलासाठी अधिक काळ दिल्यास हवामानाच्या अंदाजात चूक होत नाही. डॉपलर रडार, सुपर कॉम्प्युटर, बलूनने वाऱयाचा दिशा यांची निरीक्षणे मांडली जातात. ही माहिती वेगवेगळय़ा समूहात दिली जाते. हवामान निरीक्षण करणारा, पाऊस नोंदी करणारा, अंदाज करणारा असे समूह असून राज्य सरकारचा ग्रुप, डिझास्टर मॅनेंजमेंट ग्रुप, विविध निरीक्षण कार्यालयांचे समूह असे मोठे जाळे आहे. त्यामुळे 24 तास सतर्कता ठेवणे शक्य होत आहे.  ही मिळणारी माहिती हवामान विभाग प्रत्येक संबंधित यंत्रणेला टेलिफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात येते. अशी तारेवरील कसरत हवामान विभाग करत आहे. पावसाच्या युद्धपातळी काळात प्रत्येक निरीक्षण कार्यालयातील प्रत्येक घटक 24 तास सजग होते. त्यातूनच गेले 40 दिवस हवामान विभागासाठी परीक्षेचा ठरला.

राम खांदारे

Related posts: