|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » आनेवाडी टोल नाक्यावर माणुसकीने रक्षा बंधन केला साजरा

आनेवाडी टोल नाक्यावर माणुसकीने रक्षा बंधन केला साजरा 

वार्ताहर/ आनेवाडी

गेली दहा दिवस पावसाने व धरणातून पाणी सोडल्यामुळे महापुर येऊन सातारा जिल्ह्य़ातील नदीकाठी जनजीवन विस्कळीत झालेले आहे,पाण्याच्या विसर्गामुळे पुणे- बंगलूर महामार्गावरील अवजड वाहतूक करणारी यंत्रणा पूर्णपणे थांबली आहे.अशावेळी जावळी तालुक्यातील आनेवाडी टोलनाक्यावर  महामार्गावरील रस्त्यालगत थांबलेल्या वाहन चालक व क्लीनर यांच्यासाठी आनेवाडीतील फरांदे कटुबियांनी मोफत जेवणाची व्यवस्था करून माणुसकीने  रक्षा बंधन साजरा केला आहे.त्यामुळे घरापासून दूर असलेल्या अनेक बंधूंना आनेवाडीच्या बहिणीच्या घरातील जेवण करून तृप्तीचे ढेकर दिले आहेत.

 राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी सेवा रस्त्यालगत जवळपास शंभर वाहने उभी केली त्यामुळे वाहनधारकांची मोठी पंचाईत झाली होती. या वाहनधारकांसमोर पैसे असूनही सोयी सुविधाची अड़चण उभी राहिली होती. पण, आनेवाडी ग्रामपंचायत सदस्या सौ अश्विनी फरांदे व त्यांच्या पती राजेंद्र फरांदे अनेकांना मोफत चहा, नाष्टा, जेवण पुरविण्याचे काम करीत आहेत.कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी मिळू नये यासाठी त्यांनी फोटो सुद्धा या कालावधीत काढून घेतले नाहीत.कारण, आनेवाडी टोल नाक्यावर काम करणाया कर्मचायांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

     ग्रामपंचायत सदस्या सौ अश्विनी फरांदे व राजेंद्र फरांदे यांच्यासह काही मानवतेचे दूत यामध्ये सहभागी होत आहेत. रोज दोन वेळा या वाहनचालक ,क्लीनर यांना चहा ,बिस्किट जेवण वाटप करीत आहेत.   महिला ग्रामपंचायत सदस्या सौ फरांदे यानी दाखविलेल्या सामाजिक कार्याने अनेक राज्यातून आलेल्या वाहनधारकांनी त्यांचे आभार मानले आहेत.आनेवाडी व टोल नाक्यावर चहा, खानावळ व शेतीच्या उत्त्पन्न यातूनच ही सामाजिक कार्य करताना श्री फरांदे कुटुंबातील सद्यस्यांनी मदतीच्या माध्यमातून’आयत्या पिटावर रेगोटय़ा ’  मारणाया काही तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांना एक प्रकारे कृतीतून चपराक मारल्याची चर्चा आनेवाडी,कुडाळ, पाचवड भागात होत आहे.या उपक्रमाबद्दल आनेवाडी येथील फरांदे कुटूंबाचे वाहन चालक, क्लीनर यांचे नातेवाईक, जिल्हा प्रशासन व पोलीस दल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी, कर्मचारी वर्ग यांनी कौतुक केले आहे.

Related posts: