|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » मदन भोसले यांच्याकडून नुकसानीची पाहणी

मदन भोसले यांच्याकडून नुकसानीची पाहणी 

प्रतिनिधी/ वाई

अतिवृष्टीमुळे वाई तालुक्यातील मांढरदेव, बालेघर, वेरूळी परिसरातील भूस्खलन, वाहून गेलेल्या ताली, घरांची झालेली पडझड व शेतीच्या नुकसानीची पाहणी करून माजी आमदार मदन भोसले यांनी ग्रामस्थांना दिलासा देत शासकीय मदतीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

अतिवृष्टीने मांढरदेव पठार परिसरातील झालेल्या नुकसानीची पाहणी मदन भोसले यांनी केली. यावेळी त्यांनी विविध ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून ग्रामस्थांशी चर्चा केली. अतिवृष्टीने अनेक ठिकाणी भूस्खलन होऊन जमिनी खचल्या असून शेती जमिनींना मोठय़ा प्रमाणावर भेगा पडल्या आहेत. शेतातील ताली वाहून गेल्या असून अनेक घरांची पडझड झाली आहे. काही ठिकाणी नुकसानीचे पंचनामे झाले असले तरी अनेक ठिकाणी अजून झाले नाहीत. त्यावर मदन भोसले यांनी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यापुढे हा प्रश्न मांडू, असे सांगितले. तसेच येथील वाया गेलेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळावी, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, मांढरदेवचे सरपंच दादासाहेब मांढरे, विलास मांढरे, बळवंत मांढरे, आनंदा मांढरे, आनंदा शिंदे, जाधव गुरूजी यांनी मदन भोसले यांना झालेल्या नुकसानीची माहिती दिली. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती शंकरराव गाढवे, अविनाश फरांदे, दीपक ननावरे, किसन वीरचे संचालक मधुकर शिंदे, रोहिदास पिसाळ, नगरसेवक सतीश वैराट, विजय ढेकाणे, महेंद्र धनवे, अमजद इनामदार, दत्ता ढेकाणे, मोहन मांढरे, सागर मांढरे, प्रदिप भोसले, सचिन भोसले, युवराज कोंढाळकर, अल्ली आगा, रवि गाढवे आदी उपस्थित होते.

 

Related posts: