|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भाटीत 3 मीटर लांबीचा किंग कोब्रा पकडला

भाटीत 3 मीटर लांबीचा किंग कोब्रा पकडला 

प्रतिनिधी/ सांगे

नेत्रावळी अभयारण्याला टेकून असलेल्या भाटी ग्रमापंचायत क्षेत्रातील बाराजण तिस्क येथील अभयारण्य विभागाच्या राऊंड फॉरेस्ट कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मंगलदास उर्फ मारुती नाईक यांच्या घराच्या शिडीजवळ असलेल्या सुमारे 3 मीटर लांबीचा किंग कोब्रा नेत्रावळी वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱयांनी पकडला.

सोमवारी सकाळी 9च्या दरम्यान सदर कोब्राचे दर्शन घडले. त्यानंतर वन्यजीव विभागाला कल्पना देण्यात आली. त्यानंतर रेसक्यू टीमचे राजेश वेळीप यांना पोत्रेहून पाचरणा करण्यात आली. त्यानंतर पकडण्यात आले. त्यात भ्रमणध्वनी लागत नसल्याने नेत्रावळी येथे जाऊन वनरक्षकांनी पिंजरा आणला व किंग कोब्राला पकडून पिंजऱयात घातले. हा किंग कोब्रा खुपच लांब व घराच्या शिडीच्या आवाऱयात असल्याने वन्यजीव रेसक्यु कर्मचाऱयांनी अत्यंत जिकीरीने पकडले. रेसक्यू कर्मचारी राजेश वेळीप व सुधाकर वेळीप या दोघांनी मिळून किंग कोब्रा पकडण्यात यश संपादन केले. त्यानंतर किंग कोब्राला नेत्रावळी अभयारण्य कार्यालयात नेण्यात आले.

विशेष म्हणजे एक वर्षापूर्वी मंगलदास यांचे भाऊ रमाकांत नाईक यांच्या कौलारु घराच्या मध्यभागाच्या लाकडी वाशावरून वनखात्याने दोन मीटर लांबीचा किंग कोब्रा पकडला होता. या दोघांची घरे एकमेकाला टेकून आहेत. या किंग कोब्राचे दर्शन घडताच घरातील मंडळीमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र एकदाचा पकडल्यानंतर एकच सुटकेचा निश्वास सोडला. या मोहिमेत वन्यजीव विभागाचे राऊंड फॉरेस्टर उमेश परब, वनरक्षक संगम नाईक, फ्रान्सीस डीसोझा, अंकुश गावकर व कर्मचारी मधुरा गावकर यांचा समावेश होता.

Related posts: