|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आग्वाद जेलमध्ये एकाभागात बांदोडकरांचे संग्रहालय उभारून त्याला पर्रीकरांचे नाव

आग्वाद जेलमध्ये एकाभागात बांदोडकरांचे संग्रहालय उभारून त्याला पर्रीकरांचे नाव 

प्रतिनिधी/ म्हापसा

आग्वाद जेलमध्ये म्युझियम (संग्रहालय) होणार असून येथील एक विभाग गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. दयानंद बांदोडकर यांच्यासाठी राखीव ठेवण्यात यावा  अशी मागणी कळंगूटचे आमदार तथा ग्रामीण विकासमंत्री मायकल लोबो यांनी कळंगूट येथे स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या 46 व्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पुतळय़ाला हार घातल्यानंतर बोलताना केली. तसेच या संग्रहालयाला स्व. मनोहर पर्रीकर याचें नाव देण्यात येईल. अशी माहिती मंत्री लोबो यांनी दिली. या संग्रहालयाला आर्थिक निधी आणण्यासाठी स्व. पर्रीकर यांनी त्यावेळी मोठे योगदान दिले होते. यामुळे कळंगूट वासियांकडून स्व. बांदोडकर व स्व. पर्रीकर यांना ही खरी श्रद्धांजली ठरणार आहे. आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी बोलून यावर शिक्कामोर्तब करणार असल्याची माहिती लोबो यांनी दिली.

यावेळी कळंगूटच्या प्रभारी सरपंच पूजा मठकर, पंच दिनेश सिमेपुरुषकर, जिल्हा पंचायत सदस्य दत्तप्रसाद दाभोळकर, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत चोडणकर, प्रतिभा नार्वेकर, एकनाथ नागवेकर, हडफडे सरपंच दिपाली रेडकर, पंच रोशन रेडकर, अर्जुन शिरोडकर, फिलीप डायस, सोनिया दाभोळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सकारात्मक विचारांची नितांत गरज

येत्या चार वर्षात सर्वाधिक असे एकूण 4 हजार नोकऱया आम्ही देऊ शकतो. आज बेरोजगारी किती आहे? यावर तोडगा काढणे गरजेचे आहे. हिरवी औद्योगिक वसाहत आणणे गरजेचे आहे. असे झाले नाही तर राज्यातील युवक अन्यत्र जाणार आहे. यासाठी लोकांचा मानसिक दृष्टीकोन बदलणे गरजेचे आहे. आम्ही कचरा दुसऱयांच्या जागेत टाकतो. कळंगूट साफ आहे मात्र दुसऱया गावात परिस्थिती वेगळी आहे. आम्ही दूरदृष्टीकोनातून विचार करणे गरजेचे आहे. गोवा भारत उच्च पदावर नेण्यासाठी सकारात्मक विचार करण्याची आज नितांत आवश्यकता आहे. स्व. मनोहर पर्रीकरांनीही अटल सेतूवरून सकारात्मक विचार करणअयाचे आवाहन केले होते. शिक्षण महत्त्वाचे आहे. स्व. भाऊसाहेब बांदोडकर, स्व. मनोहर पर्रीकर यांचे विचार पुढे नेणे काळाची गरज आहे असे मंत्री लोबो म्हणाले. स्थानिक तरुण नोकरीसाठी विदेशात जातात व म्हातारपणात परततात ही समस्या दूर करण्यासाठी सरकारला वेगळे धोरण आखावे लागेल. जेणेकरून तरुणांना देशाबाहेर जाण्याची वेळ लागणार नाही असे मंत्री लोबो यांनी सांगितले.

कळंगूट मतदारसंघात आग्वाद येथे जी जेल होती तिचे काम आता सुरू होणार आहे. काम करण्याचा आदेश कंत्रादारांना दिला आहे. 24 कोटी 50 लाख हा निधी केंद्रीय सरकारच्या वतीने पर्यटन मंत्रालयकडून देण्यात आला आहे. येथील एक भाग स्व. बांदोडकरांसाठी राखीव ठेवण्यात यावा यासाठी आपण पर्यटन अधिकारी वर्ग व मुख्यमंत्र्याकडे बोलणार असल्याचे मंत्री लोबो यांनी सांगितले. स्व. बांदोडकर यांच्या कुटुंबियांकडे बोलणी करून भाऊंच्या आठवणीतील काही पुस्तके आदी वस्तू येथे ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारकडे आहे ते पाहणार, लोकांकडेही त्यांच्या आठवणी, फोटो असणार ते येथे ठेवण्यात येईल. यासाठीही निधी आला आहे तो स्व. पर्रीकरामुळेच. हे संग्रहालय कसे तयार करावे यासाठी ते झटले व आराखडाही तयार केला होता. त्यांचे स्वप्न साकारण्यासाठी या संग्रहालयाला स्व. मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर असे नामकरण करण्यात येईल. असे मंत्री लोबो यांनी स्पष्ट केले. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संग्रहालयासाठी 12 बसेस ठेवणार

या जेलचा इतिहास मोठा आहे व त्याची आठवण म्हणून ही श्रद्धांजलीच्या स्वरुपात हा मान देण्यात येईल. दोघेही दूरदृष्टीकोनातील नेते आहेत. आम्ही या मतदारसंघात स्व. पर्रीकर यांना काहीतरी करायला पाहत होतो या पेक्षा अन्य काही मोठे आम्ही करू शकत नाही. येथे अंदाजे दरवर्षी 35 ते 40 हजार पर्यटक येतात. ऑफ सिझनमध्ये 15 हजार येतात. यासाठी फोर्ट आग्वाद ते म्युझियम दरम्यान ये-जा करण्यासाठी 12 बसेस ठेवम्यात येणार आहे. अशी माहिती मंत्री लोबो यांनी दिली. राज्यातील स्वतंत्र्य सैनिक गोव्याच्या मुक्तीसाठी भांडले त्यापैकी काहीजणांचे पुतळेही येथे उभारण्यात येणार आहे. एक वेगळय़ा पद्धतीचा राज्यातील म्युझियम बनविण्याचा आपला दृष्टीकोन असल्याचे लोबो यांनी सांगितले. स्व. मनोहर पर्रीकर यांच्या आठवणी, फोटो, बालपणाची माहिती आदी या म्युझियममध्ये ठेवण्यात येणार आहे. बालपणात ते मुख्यमँत्री, रक्षामंत्री आदी सर्व माहिती येथे ठेवण्यात येईल. 1950 ते 1961 मध्ये स्वातंत्र्य सैनिक होते त्यांची माहिती पूर्वीचे स्वातंत्र्य सैनिक आदी सर्वांची माहिती येथे देण्यात येईल. अशी माहिती लोबो यांनी दिली. 

Related posts: