|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » राज्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

राज्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता 

प्रतिनिधी/ पणजी

राज्यात मान्सूनचा जोर थोडा मंदावला आहे. मात्र आगामी दोन दिवसात पुन्हा जोरदार पाऊस पडेल, असा इशारा पणजी वेधशाळेने दिला आहे. गेल्या 24 तासात राज्यात केवळ 9.6 मि. मी. एवढीच पावसाची नोंद झाली.

सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. आगामी 48 तासात राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. गेल्या 24 तासात सर्वत्रच अत्यल्प पाऊस झाला. काणकोण, मुरगाव व सांगे भागात पाऊण इंच, पेडणे, पणजी, सांखळी, दाबोळी, केपे आदी भागात अर्धा इंच पेक्षा कमी पाऊस झाला.

पणजीत एकूण 102 इंच पाऊस

आगामी 48 तासात सर्वत्र जोरदार वादळी वाऱयासह पावसाची शक्यता आहे. समुद्र अद्याप खवळलेला आहे. मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्याने दिला. गेल्या 24 तासात पडलेल्या 9.6 मि. मी. पावसामुळे राज्यात आतापर्यंत पडलेला पाऊस 2590.7 मि. मी. म्हणजेच 102 इंच एवढी नोंद झाली असून ती पणजीत नोंदविलेली आहे.

राज्यात एकूण 102 इंच पाऊस

राज्यात यंदाच्या मौसमात सर्वत्र दमदार पावसाची नोंद झाली असल्याने संपूर्ण सरासरी काढताना आतापर्यंत 108 इंच पाऊस झालेला आहे. वाळपई जवळपास 140 इंच तर सांखळीत 121 इंच पाऊस झालेला आहे. सांगेमध्ये 122 इंच पावसाची नोंद आतापर्यंत झाली आहे.

 

 

 

 

Related posts: