|Saturday, October 19, 2019
You are here: Home » Automobiles » सुझुकीची ‘ऍक्सेस 125’ नव्या रुपात दाखल

सुझुकीची ‘ऍक्सेस 125’ नव्या रुपात दाखल 

ऑनलाईन टीम / मुंबई :

‘सुझुकी’ने आपली सर्वाधिक खपाची स्कूटर ‘ऍक्सेस 125’ ही नव्या रुपात बाजारात दाखल केली आहे.

‘सुझुकी ऍक्सेस 125’ ला ड्रम ब्रेक तसेच अलॉय व्हिलसह नवे रुप देण्यात आले आहे. सुझुकीच्या ऍक्सेस 125 मध्ये 124 सीसीचे 4 स्ट्रोक, सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 8.7 पीएस आणि 10.2 एनएमचे टॉर्क देते. जुन्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. या स्कूटरमध्ये स्टार्ट सिस्टम बसवण्यात आली आहे. सेंट्रल लॉकिंग आणि सुरक्षासाठी शटर यासारखे फीचर देण्यात आले आहेत.

ही स्कूटर पर्ल सुझुकी डीप ब्लू, ग्लास स्पार्कल ब्लॅक, मेटालिक मॅट फायब्रोइन ग्रे आणि पर्ल मिराज व्हाइट या चार रंगात उपलब्ध आहे. सुझुकीच्या या नव्या सुझुकी ऍक्सेस 125 ची किंमत 59 हजार 891 रुपये तर स्पेशल एडिशनची किंमत 61 हजार 590 रुपये आहे.