|Thursday, August 22, 2019
You are here: Home » Top News » कोल्हापूर : जमावबंदीचा आदेश अखेर मागे

कोल्हापूर : जमावबंदीचा आदेश अखेर मागे 

ऑनलाइन टीम /कोल्हापूर : 

कोल्हापूर जिह्यात 12 ते 24 ऑगस्टला रात्री 12 वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्हाबंदीचा आदेश जारी केला होता. मात्र, या आदेशाबाबत चहुबाजूंनी टीका झाल्यामुळे अखेर हा जमावबंदीचा आदेश मागे घेण्यात आला आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून जिह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या महापुराच्या परिस्थितीमुळे विस्कळीत झालेले मन यातून पूरग्रस्त व नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्मयता आहे. या पार्श्वभूमीवर जिह्यात काही अनपेक्षित घटना घडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्मयता आहे, या पार्श्वभूमीवर अपर जिल्हादंडाधिकारी संजय शिंदे यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम, 1951 चे कलम 37(1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये कोल्हापूर जिह्यात 12 ते 24 ऑगस्टला रात्री 12 वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्हा बंदीचा आदेश जारी केला होता. मात्र, या आदेशाबाबत चहुबाजूंनी टीका झाल्यामुळे अखेर हा जमावबंदीचा आदेश मागे घेण्यात आला आहे.