|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » 16 ऑगस्टला ‘स्मृतीगंध’ मैफलीचे आयोजन

16 ऑगस्टला ‘स्मृतीगंध’ मैफलीचे आयोजन 

पुणे /प्रतिनिधी : 

नटवर्य प्रभाकर पणशीकर यांचे वडील बंधू आबाजी पणशीकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त 16 ऑगस्टला संध्याकाळी 5.00 वाजता, माधवराव पटवर्धन सभागृह, महाराष्ट्र साहित्य परिषद येथे ‘स्मृतीगंध’ या भक्तीगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामुल्य खुला असल्याचे बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचे अध्यक्ष गायक-अभिनेते सुरेश साखवळकर यांनी सांगितले.

सुरेश साखवळकर म्हणाले, या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाभारताचे भाष्यकार दाजीशास्त्री पणशीकर भूषविणार असून प्रमुख पाहुणे म्हणून संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे उपस्थित राहणार आहेत. यावेळी कै. आबाजी पणशीकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे.