|Friday, November 15, 2019
You are here: Home » Top News » रेल्वे गाडय़ा रद्द : प्रवाशांच्या तिकीटाचे पैसे परत

रेल्वे गाडय़ा रद्द : प्रवाशांच्या तिकीटाचे पैसे परत 

ऑनलाइन टीम/ मुंबई : 

जुलै आणि ऑगस्टमध्ये रेल्वे रुळावर पाणी साचल्याने रेल्वेला गाडय़ा रद्द कराव्या लागल्या होत्या. मध्य रेल्वेला पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या तिकीटाचे पैसे परत केले असून यासाठी मध्य रेल्वेने 36.7 लाख प्रवाशांना तिकिटाचे पैसे परत केले आहे.

जुलैच्या शेवटच्या तसेच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात मुंबईत मुसळधर पाऊस झाल्याने रेल्वे रूळावर पाणी साचले होते. त्यामुळे अनेक एक्स्प्रेस तसेच लोकल रद्द कराव्या लागल्या होत्या. गाडय़ा रद्द कराव्या लागल्याने उपनगरीय रेल्वेतील प्रवाशांना 13 कोटी रुपये परत दिल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

 

Related posts: