|Friday, November 15, 2019
You are here: Home » Top News » कोयना धरणाचे दरवाजे तीन फुटांवर स्थिर

कोयना धरणाचे दरवाजे तीन फुटांवर स्थिर 

ऑनलाइन टीम / पाटण : 

महाबळेश्वर, नवजासह कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने सहा वक्री दरवाजे एका फुटाने कमी करण्यात आले आहेत. मंगळवारी दुपारी धरणाचे दरवाजे तीन फुटांवर स्थिर ठेऊन धरणातून
प्रतिसेकंद 27 हजार 265 क्मयुसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

महाराष्ट्राची वरदायिनी मानल्या जाणाऱया कोयना धरणात सध्या प्रतिसेकंद सरासरी 25 हजार 287 क्मयुसेक पाण्याची आवक होत आहे. धरणात येणाऱया पाण्यापेक्षा सोडण्यात येणाऱया पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने धरणातील एकूण पाणी साठय़ात घट होत आहे. धरणात आता एकूण 101.35 टीएमसी पाणीसाठा झाला असून त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा 96.35 टीएमसी इतका झाला आहे. आगामी काळातील पाऊस व येणारे पाणी याचा विचार करून धरणाचे दरवाजे कमी – जास्त उघडझाप केले जातील, अशी माहिती कोयना सिंचन विभागाकडून देण्यात आली आहे.

 

Related posts: