|Friday, November 15, 2019
You are here: Home » Top News » महापुर : केरळ – कर्नाटकमध्ये बळींची संख्या 130

महापुर : केरळ – कर्नाटकमध्ये बळींची संख्या 130 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

देशातील अनेक राज्यांमध्ये महापूर-भूस्खलन आणि अतिवृष्टीमुळे घडलेल्या अपघातांमध्ये गेल्या 12 दिवसात 200 नागरीकांना आपला जीव गमवावा लागला आहे. केरळ आणि कर्नाटकमध्ये आतापर्यंत 130 नागरीकांचा मृत्यू झाल्याचे सुत्रांकडून समजते आहे. केरळमधील 14 जिल्हे महापूर व भूस्खलनाच्या घटनांनी प्रभावित झाले आहेत. येथे 8 ते 12 ऑगस्ट दरम्यान 88 जणांचा मृत्यू झाला. तर, 53 जण बेपत्ता आहेत. कर्नाटकमध्ये 42 आणि महाराष्ट्रात 43 नागरीकांचा मृत्यू झालेला आहे.

केरळ राज्यात भूस्खलनामुळे मलप्पुरममध्ये सर्वाधिक 29, कोझिकोडमध्ये 17, वायनाडमध्ये 12, कन्नूरमध्ये 9, त्रिशूर आणि इडुक्की जिह्यात प्रत्येकी 5, तिरुवनंतपुरम, अलप्पुझा, कोट्टायम आणि कसारगोड जिह्यात प्रत्येकी 2 नागरीकांना जीव गमवावा लागला आहे. तर 53 जण बेपत्त असल्याचे समोर आलेले आहे.

 

Related posts: