|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » केसरीत महिलेवर रानडुकराचा हल्ला

केसरीत महिलेवर रानडुकराचा हल्ला 

वार्ताहर / ओटवणे:

शेतीचे काम आटोपून घरी परतताना रानडुकराने महिलेवर हल्ला केला. या हल्ल्यात सदर महिला गंभीर जखमी झाली. सोबत असलेल्या पतीने आरडाओरड करीत दगड, काठय़ांनी या डुकराला पिटाळून लावले. त्यामुळे सुदैवाने महिला बचावली. ही घटना केसरी-आलाटीवाडीत सोमवारी घडली. सरिता शांताराम जंगले असे जखमी महिलेचे नाव आहे.

आलाटीवाडीतील सौ. सरिता या पती शांताराम यांच्यासोबत घरानजीकच्या चिबडाच्या शेतीतून परतत होत्या. दरम्यान, रानडुकरांचा कळप अचानक त्यांच्या दिशेने चाल करून आला. या कळपातल्या एका डुकराने सौ. सरिता यांच्यावर थेट हल्ला करीत त्यांना खाली पाडले. यावेळी सोबत असलेल्या पती शांताराम यांनी आरडाओरड करीत दगड, काठय़ांनी या डुकराला पिटाळत पत्नीची सुटका केली. त्यानंतर हा डुकर कळपासोबत पुढे निघून गेला. या रानडुकराने आपल्या सुळय़ांनी सरिता यांच्या उजव्या हाताच्या दंडावर प्रहार केल्याने त्या जखमी झाल्या. शिवाय या झटापटीत त्यांना मुका मार बसला. या अचानक हल्ल्यामुळे जंगले दाम्पत्याची भीतीने गाळण उडाली. त्यांनी कसेबसे स्वतःला सावरत घर गाठले. त्यानंतर सरिता यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले. मात्र, मंगळवारी त्यांना या हल्ल्यातील जखमेचा व मुक्मया माराचा त्रास होऊ लागल्याने त्यांच्यावर दाणोली बाजारातील डॉ. लवू सावंत यांनी उपचार केले.

Related posts: