|Saturday, December 14, 2019
You are here: Home » उद्योग » पहिल्या तिमाहीत सोने आयात 35.5 टक्क्यांनी वाढली

पहिल्या तिमाहीत सोने आयात 35.5 टक्क्यांनी वाढली 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील सोने आयात चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) मध्ये 35.5 टक्क्यांनी वाढत 11.45 अब्ज डॉलर (जवळपास 80 हजार कोटी रुपये) च्या घरात पोहोचली आहे. एक वर्षापूर्वी ही आयात  8.45 अब्ज डॉलर्सवर होती. (59,000 कोटी रुपये) सोन्याची आयात वाढल्याने  देशाच्या चालू खात्यातील तोटय़ात वाढ होत जात असल्याचे म्हटले आहे. व्यावसायिक वर्ष 2018-19 मध्ये देशातील चालू खात्यातील नुकसान (सीएडी)57.2 डॉलर म्हणजे 2.1 टक्के जीडीपीच्या बरोबरीत आहे.

व्यापारी नुकसानीत वाढ

वाणिज्य मंत्रालयाकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार  सोने आयात वाढल्याच्या कारणांमुळे देशातील व्यापाराच्या  नुकसानीत वाढ झाली आहे. एप्रिल-जून  2019मध्ये तिमाहीत कालवधीत व्यापारात 45.96 अब्ज डॉलरचा तोटा झालेला आहे. जो तोटा एक वर्षापूर्वीच्या समान तिमाहीत 44.94 अब्ज डॉलर्स झाला होता. चालू जानेवारीनंतर सोने आयातीमध्ये मोठी वाढ होत गेल्याची नोंद करण्यात आली आहे. यात फेब्रुवारीत 11 टक्क्याची सोने आयात झालेली आहे.

Related posts: