|Saturday, December 14, 2019
You are here: Home » उद्योग » सॅमसंग-शाओमी सादर करणार 108एममी कॅमेऱयाचा स्मार्टफोन

सॅमसंग-शाओमी सादर करणार 108एममी कॅमेऱयाचा स्मार्टफोन 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

सॅमसंग जगातील पहिला 108 मेगापिक्सल कॅमेरा असणार सेंसर स्मार्टफोन सादर करणार आहे. यांचे सादरीकरण चीनमधील स्मार्टफोन कंपनी शाओमीला एकत्र घेऊन सादरीकरण करणार असल्याचे सांगितले आहे. सदरच्या स्मार्टफोनचे नावा ‘सॅमसंग आयएससीइएलएल ब्राइट एचएमएक्स ठेवण्यात आले आहे. हा जगातील पहिला असा स्मार्टफोन असणार आहे की ज्याचा कॅमेरा 100 मिलियन पिक्सल छायाचित्र टिपण्याची क्षमता राहणार असल्याचे कंपनीकडून यावेळी स्पष्ट केले आहे.

फोटोसाठी विशेष सुविधा

सॅमसंग आणि शाओमी एकत्रित येऊन 64 मेगापिक्सलचा एक वेगळा कॅमेरा असणाऱया फोनची निर्मिती करत असून त्यांचे लाँचिंग डिसेंबरपर्यंत करण्याचे संकेत नोंदवण्यात आले आहेत. तर नवीन स्मार्टफोन कमी प्रकाशामध्ये सुंदर छायाचित्र टिपण्याची क्षमता असल्याचा दावा कंपन्यांनी केला आहे.

Related posts: