|Thursday, August 22, 2019
You are here: Home » उद्योग » पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक विकासात्मक

पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक विकासात्मक 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताला 5 ट्रिलियन डॉलर क्षमतेची अर्थव्यवस्था म्हणून विकसित करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशिल राहणार असल्याचे म्हटले आहे. यासाठी मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करण्यासाठीची योजना आखण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात सरकार येत्या पाच वर्षांतील पायाभूत सुविधा क्षेत्रात 100 लाख कोटी रुपयाहून अधिकची रकम गुंतवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ही बाब आर्थिक विकासाला चालना देण्यास लाभदायक असून यात रियल इस्टेट उद्योग नफ्यात राहण्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत.
भारतीय अर्थव्यवस्थाही अन्य अर्थव्यवस्थेच्या तुलनेत पुढे जाणारी आहे. कारण विविध क्षेत्रातील होणारी गुंतवणूक ही देशाचा आर्थिक विकासाचा दर वृद्धींगत करण्यात मोठी मदत करत असल्याचे नोंदवले आहे. यात उत्पादनात सुधारणात्मक बदल होणार आहेत. त्यात लहान मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मितीमध्ये वेग धरणार आहे त्याचाच फायदा येणाऱया काळात आर्थिक विकासाचा दर वाढवण्यास प्रयत्नशिल राहणार आहे.
2023 पर्यंत गुंतवणूक
रेल्वे, रस्ते, विमान, बंदरे, स्मार्ट सिटी, वीज, आणि शहरांतर्गत कनेक्टिग नेटवर्किगच्या उभारणीवर विकास येत्या काळात सरकार काम करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यातील महत्वाचा विकास हा रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये करण्यात येणार असून त्यासाठी 2030 पर्यंत 50 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना तयार करणार आहे.
अर्थसंकल्पात व्यावसायिक क्षेत्रांना चालना देण्यासाठी ट्रांझिट ओरिएंटेड डेव्हलपमेन्ट (टीओडी) मॉडेलला प्रेत्साहन देण्यास प्रयत्न करण्यात आला आहे. त्याला येणाऱया काळात चालना दिली जाणार आहे.