|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » लाल चौकात गृहमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण?

लाल चौकात गृहमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण? 

श्रीनगर 

 केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे 73 वा स्वातंत्र्यदिन जम्मू-काश्मीरमध्ये साजरा करण्याची शक्मयता आहे. 14 ऑगस्ट रोजी श्रीनगरसाठी रवाना होण्याची योजना शाह आखत असल्याचे वृत्त आहे. कलम 370 हटविण्यात आल्यावर यंदाच्या स्वातंत्र्यदिनी श्रीनगरच्या लालचौकात ध्वजारोहण केले जाणार असल्याची चर्चा आहे. बिहारचे मुख्यमंत्री आणि संजदचे अध्यक्ष नितिश कुमार यांनी याला पाठिंबा दर्शविला आहे.

केंद्र सरकारने कलम 370 हटविण्यासह जम्मू-काश्मीरला लडाखला वेगळे करत दोघांनाही केंद्रशासित प्रदेश घोषित केले होते. गृहमंत्र्यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी लाल चौकात तिरंगा फडकविण्यात आल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारचे हे दुसरे ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे. श्रीनगरला भेट दिल्यावर शाह हे 16 आणि 17 ऑगस्ट रोजी लडाखच्या दौऱयावर असणार आहेत.

15 ऑगस्टच्या कार्यक्रमाच्या तयारींबद्दल केंदीय स्तरावर चर्चा सुरू आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सध्या काश्मीर खोऱयाच्या दौऱयावर आहेत. पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनांकडून धमक्या मिळत असूनही 26 जानेवारी 1992 रोजी तत्कालीन भाजप अध्यक्ष मुरली मनोहर जोशी आणि नरेंद्र मोदी (तेव्हाचे संघ प्रचारक) यांनी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकविला होता.

नॅशनल कॉन्फरन्सचा विरोध

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 1948 मध्ये श्रीनगरच्या लाल चौकात पहिल्यांदा तिरंगा फडकविला होता. तर नॅशनल  कॉन्फरन्सचे नेते मजीद मेमन यांनी कलम 370 हटविण्यात आल्यावर श्रीनगरमध्ये तिरंगा फडकविण्याच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. केंद्र सरकारने काश्मिरींवर स्वतःचा निर्णय लादला आहे. काश्मिरींचे म्हणणे देखील ऐकून घेतले जावे, असे मेमन म्हणाले.

Related posts: