|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » राख्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी

राख्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी 

बेळगाव

रक्षाबंधनाचा पवित्र सण गुरुवारी साजरा होत आहे. या सणाच्या निमित्ताने बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली होती.

शहरातील पांगुळ गल्ली, कडोलकर गल्ली, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली आदी विविध परिसरात सर्व दुकानांमध्ये वेगवेगळय़ा प्रकारच्या राख्या दाखल झाल्या आहेत. यामध्ये लहान मुलांसाठी टेडी, कार्टून, छोटा भीम, गणपती, डोरेमॉन, सेलवरील राखी यासह 100 नमुन्याच्या राख्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. मोठय़ांसाठी रुद्राक्ष, स्टोनमध्ये वेगवेगळे पॅटर्न, कुंदन, चांदी, गोल्डन पॉलीश व श्रीच्या, मोरच्या प्रतिकृती असलेल्या राख्यादेखील आहेत. या राख्यांची किंमत 2 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत आहे. डझनावर राख्यांची किंमत 12 रुपयांपासून 3000 रुपयांपर्यंत आहे.

राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश व उत्तर प्रदेशमध्ये बहिणीने आपल्या भावाच्या बायकोला राखी बांधण्याची पद्धत आहे. त्यासाठी ही लुम्बा राखीदेखील बाजारपेठेत उपलब्ध आहे. तिची किंमत 50 ते 500 रुपयांपर्यंत आहे. रक्षाबंधन व स्वातंत्र्यदिन एकाच दिवशी असल्याने तिरंगी रंगातील राख्यादेखील बाजारात दाखल झाल्या आहेत.

 

Related posts: