|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सोलापूरचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

सोलापूरचा पूरग्रस्तांना मदतीचा हात 

प्रतिनिधी/ कोल्हापूर
महापूरामुळे कोल्हापूर शहरासह जिल्हय़ात अस्मानी संकट कोसळले आहे. या संकटातून पूरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी सोलापूर जिल्हय़ातील हजारो हात सरसावले आहेत. शिवसेना सोलापूर जिल्हा शाखेकडून 25 हजार चादरी व 7 टन धान्य शिवसेना सहायता केंद्राकडे सुपुर्द करण्यात आले. युवा नेते ऋतुराज क्षीरसागर यांनी सोलापूरहून आलेली मदत स्विकारून त्यांचे आभार मानले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेकडुन भरघोस मदतीचा ओघ सुरु झाला आहे. शहरात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावतीने दसरा चौकातील सीकेपी बोर्डींगमध्ये शिवसेना पुरग्रस्त सहाय्यता केंद्राची स्थापना केली आहे. या केंद्रातुन शहरातील पुरग्रस्त भागात मदत पोहोच केली जाणार आहे. यामध्ये जीवनावश्यक वस्तु, अन्नधान्य, कपडे, चादर आदि स्वरुपात मदत केली जाईल.
सोलापूर जिल्हा शिवसेनेच्यावतीने या मदत केंद्रात भरघोस मदत जमा करण्यात आली. शिवसेनेचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत, सोलापूर जिल्हा समन्वयक शिवाजीराव सावंत, पृथ्वीराज सावंत, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ढोंगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी 25 हजार चादर व 1 ट्रक धान्य मदत कोल्हापुरात आणून देण्यात आली.
ऋतुराज पाटील म्हणाले, शिवसेना पुरग्रस्त नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. पुरग्रस्त भागात 3 दिवस मेडिकल कॅम्प सुरु असुन रुग्णांची वैद्यकीय जबाबदारी आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनने घेतली आहे. सोलापूर जिल्हय़ाप्रमाणे ईतर जिल्हय़ातूनही मदत मिळणार असुन शहरासह जिल्हय़ातील प्रत्येक पुरग्रस्त नागरिकांना हि मदत पोहोच करणार आहोत. यावेळी सोलापूर जिल्हा शिवसेनेचे नितीन शेळके, छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोद पाटील, बालाजी मार्गम, व्यंकटेश नंद्याळ, पंढरपूर शिवसेना प्रमुख संदिप केंदळे, सिद्धेश्वर भोसले, राहुल व्यवहारे, ओंकार बसवंती, कोल्हापूर शहर शिवसेनेचे दिपक गौड, राजु पाटील, सुजित देशपांडे, विक्रम पवार, निवास राऊत, ओंकार परमणे, रविंद्र सोहनी, रणजित सासने, मुकुंद मोकाशी, अमोल बुढ्ढे, अरूण पाटील, कोल्हापूर युवा सेनेचे मनजित माने आदि शिवसैनिक उपस्थित होते.