|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ पुरस्कार जाहीर

अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ पुरस्कार जाहीर 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना वीर चक्र पुरस्कार जाहीर झाला आहे. उद्या स्वातंत्र्यदिनी त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्वातंत्र्यदिनानिमित्त दरवषीप्रमाणे शौर्य पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. यंदाही शौर्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. स्क्वॉड्रन लीडर मिंती अग्रवाल यांना ‘युद्ध सेवा पदक’ जाहीर झाले आहे.

बालाकोट हल्ल्यानंतर अभिनंदन वर्धमान यांनी सीमेवर मिग 21 बायसनद्वारे पाकिस्तानचे अत्याधुनिक एफ 16 हे विमान पाडले होते. अभिनंदन यांच्या मिग 21 या लढाऊ विमानाच्या तुलनेत पाकिस्तानचे एफ 16 हे लढाऊ विमान अत्याधुनिक आणि अधिक शक्तिशाली होते. या लढाईत अभिनंदन यांचे मिग 21 कोसळले, तेव्हा ते पाकच्या हद्दीत पोहचले. भारताने त्यांना पाकमधून सुखरुप भारतात आणले.