|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » 14 ऑगस्ट : ‘सचिन’ युगाची सुरवात

14 ऑगस्ट : ‘सचिन’ युगाची सुरवात 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये 14 ऑगस्ट या तारखेला खूप महत्त्व आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सोनेरी दिवस. एकिकडे सर डॉन ब्रॅडमन युगाचा शेवट आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकर युगाची सुरुवात झाली. याच दिवशी सचिनने इंग्लंडविरूद्ध ओल्ड ट्रफर्डच्या मैदानावर 225 मिनिटे खेळपट्टीवर टिकून खेळ करताना 189 चेंडूंत 17 चौकारांसह नाबाद 119 धावा केल्या. त्याच्या खेळीच्या बळावर भारताला तो कसोटी सामना वाचवणे शक्मय झाले होते.